Tamil Nadu Firecracker Factory Blast News Saamtv
देश विदेश

Tamil Nadu News: मोठी दुर्घटना! फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; ८ कामगारांचा मृत्यू, ६ जखमी

Tamil Nadu Firecracker Factory Blast News: तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ८ कामगारांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.

Gangappa Pujari

Firecracker Factory Blast:

तमिळनाडूमधून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. तमिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील एका फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ८ कामगारांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) विरुधुनगर जिल्ह्यात शनिवारी फटाक्यांच्या कारखान्यात स्फोट झाला. या दुर्घटनेत कारखान्यात काम करणाऱ्या ८ कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर इतर 6 कामगार जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी शिवकाशीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट इतका भीषण होता की ज्या घरामध्ये कारखाना सुरू होता ते घर पूर्णपणे कोसळले आणि जवळपासच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले.

या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. स्फोटानंतर आरडाओरडा केल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलीस आले आणि पोलीस आणि अग्निशमन दलाच्या टीमसह स्थानिक लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्राथमिक तपासात कारखान्यातील केमिकल मिक्सिंग रूममध्ये स्फोट झाल्याचे समोर आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जणांचा चिरडून मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पोलिसांनी सांगितले. मात्र, आतापर्यंत या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ महिलांचा समावेश आहे. सहा गंभीर जखमींना शिवकाशी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सिंहस्थ कुंभमेळासाठी केंद्र-राज्य सरकारकडून २५ हजार कोटींचा विकास आराखडा|VIDEO

Manoj Jarange: दादांनी आता संभाळून राहावं; धनंजय मुंडेंवरून जरांगे पाटील यांचा अजित पवारांना इशारा

Budh Uday 2025: 27 नोव्हेंबर रोजी या राशींच्या नशीबाला मिळणार कलाटणी; बुध ग्रहाचा होणार उदय

‘विचारा इस्लामाविषयी’ फलकांवरून अमरावतीत खळबळ! खासदार अनिल बोंडे संतप्त|VIDEO

Winter Health : हिवाळ्यात केळं खाण्याचे फायदे, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT