PM Narendra Modi Speech ANI
देश विदेश

Caste Census : मोदी सरकारचा विरोधकांवरच स्ट्राइक; जातनिहाय जनगणना करणार, कॅबिनेटचा मोठा निर्णय

Caste Census update : मोदी सरकारचा विरोधकांवरच स्ट्राइक केला आहे. भारत सरकारने जातनिहाय जनगणना करणार असल्याचा निर्णय घेतलाय.

Vishal Gangurde

जातनिहाय जनगणनेच्या मागणीसाठी आक्रमक असलेल्या काँग्रेससह इतर विरोधी पक्षांवरच मोदी सरकारनं स्ट्राइक केला आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह इतर पक्षांच्या नेत्यांनी या मागणीवरून केंद्र सरकारला अनेकदा घेरलं होतं. तर इतर राज्यांतील प्रादेशिक पक्षांनीही जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली होती. आता याचाच परिणाम म्हणून केंद्र सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे.

केंद्र सरकारने आज बुधवारी ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. भारत सरकारकडून कॅबिनेट बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत जातनिहाय जनगणना करणार असल्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. मोदी सरकारचा हा निर्णय सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास, समान प्रतिनिधित्वच्या दिशेत मोठा पाऊल मानलं जात आहे.

जातनिहाय जनगणनेमुळे समाजातील विविध समुदायांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती समोर येणार आहे. या निर्णयाने धोरणे आणि योजना अधिक चांगल्या पद्धतीने लागू करण्यास मदत मिळू शकते. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं की, 'कॅबिनेट बैठकीत आज ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले. त्यात जातनिहाय जनगणना घेणार असल्याचा महत्वाचा निर्णय देखील घेण्यात आला आहे'.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जातनिहाय जनगणनेवरून काँग्रेसवर तिखट वार केला. वैष्णव यांनी म्हटलं की, 'काँग्रेसने सत्तेत असताना जातनिहाय जनगणना गांभीर्याने घेतली नाही. तेच लोक आता राजकीय हत्यार म्हणून वापरत होते. जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्याचा काँग्रेस आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी राजकीय हितासाठी वापर केला. त्यांना सामाजिक उद्देशाची चिंता नाही'. संविधानाच्या अनुच्छेदानुसार २४६ अतंर्गत काही राज्य सरकारला सामाजिक सर्वेक्षण करण्याचा अधिकार आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Courtroom Drama: इमरान हाश्मीचा 'हक' पाहायला जायचा प्लॅन करताय? त्याआधी ओटीटीवर पाहा 'हे' कोर्टरूम ड्रामा चित्रपट

Maharashtra Live News Update: मरीन लाईन्स परिसरातील इमारतीला आग

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या हत्येच्या कटाप्रकरणी दोघे ताब्यात, हत्येची सुपारी देणारा बडा नेता कोण?

Ind vs Aus: भारताच्या धारदार गोलंदाजीसमोर बॅटिंग ढासळली; सिरीजमध्ये टीम इंडिया आघाडीवर

Bihar Election: उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला घेराव; वाहनांवर दगड, शेणफेक, बूथ कॅप्चरिंगचा प्रयत्न, मतदानावेळी तुफान राडा

SCROLL FOR NEXT