Breaking News:  Saam tv
देश विदेश

China Landslide: मोठी दुर्घटना! चीनमध्ये भूस्खलनात ४७ लोक ढिगाऱ्याखाली अडकले; बचावकार्य सुरू

Gangappa Pujari

China Landslide News:

चीनमधून मोठी दुर्घटना समोर आली आहे. चीनच्या युनान प्रांतात भूस्खलन होऊन सुमारे ४० हून अधिक जण गाडले गेले आहेत. चीनमधील स्थानिक वृत्तपत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे. चिनी वृत्तांनुसार युनान प्रांतात सोमवारी १८ घरे गाडली केली ज्यामध्ये अनेक जण बेपत्ता झालेत तर २०० जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दक्षिण-पश्चिम चीनच्या युनान प्रांतात झालेल्या भूस्खलनात 44 लोक गाडले गेले. 18 वेगवेगळ्या घरांमधील दबल्या गेलेल्या पीडितांना शोधण्यासाठी बचाव प्रयत्न सुरू आहेत. या भूस्खलनाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्यासाठी 33 अग्निशमन वाहने आणि 10 लोडिंग मशीनसह 200 हून अधिक बचाव पथकातील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

अपघाताचा परिसर झेनजियांग काउंटीमधील तांगफांग शहराचा आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू असल्याचे प्रशासनाने निवेदन जारी केले आहे. बाधित भागातून मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली दबलेल्या लोकांना बाहेर काढण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भूस्खलन कसे होते?

डोंगराळ भागातून खडक पडणे, जमीन घसरणे, चिखलाचा जोरदार प्रवाह किंवा ढिगाऱ्यांचा विनाशकारी प्रवाह इत्यादींना भूस्खलन असे नाव दिले जाते. भूस्खलनाची अनेक कारणे आहेत. यामध्ये नैसर्गिक घटनांचा समावेश होतो परंतु निसर्गातील मानवी हस्तक्षेप हे देखील एक प्रमुख कारण मानले जाते.जंगल तोडण्याव्यतिरिक्त, भूकंप आणि मुसळधार पावसामुळे मोठ्या भूस्खलनाचे प्रमाण देखील दिसून येते. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला मिळणार 3000 रुपये? CM शिंदे यांनी केलं मोठं वक्तव्य; वाचा...

IND-W vs PAK-W: You Miss I Hit..! पहिलीच ओव्हर अन् रेणुकाच्या In Swinger वर फेरोजाची दांडी गुल

Marathi News Live Updates : पुण्यात भरधाव वेगात असलेल्या डंपरने घेतला तरुणीचा जीव

Trend Shoes In India: शूजच्या या टॉप ब्रँडनी भारतीयांना घातलेय भूरळ, सध्या खूपच आहेत ट्रेंडिंगमध्ये

Ajit Pawar : भाऊबीजेची ओवाळणी मिळेल, पण लाडक्या भावाला विसरू नका; अजित पवार असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT