Manmad Fire News: मनमाडमध्ये कंपनीला भीषण आग; बॉयलर फुटल्याने नागरिकांमध्ये घबराट

Fire News: घटनेची माहिती मिळताच मनमाडचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहे. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग मोठ्याप्रमाणावर असल्याने प्रयत्न अपुरे पडतायत.
Manmad Fire News
Manmad Fire NewsSaam TV
Published On

Manmad News:

मनमाडमध्ये आगीची मोठी घटना घडली आहे. नगरचौकी भागात असलेल्या कंपनीला भीषण आग लागली आहे. निंबस पॅकेजिंग कंपनीतील बॉयलर फुटल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळालीये.

Manmad Fire News
Solapur Fire News: सोलापुरात विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचा तेंदूपत्ता जळून खाक

घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सदर कंपनीत कागदी खोके तयार करण्याचे काम सुरू होते. आगीमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर धुराचे लोट पसरले आहेत. घटनेची माहिती मिळताच मनमाडचे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र आग मोठ्याप्रमाणावर असल्याने प्रयत्न अपुरे पडतायत.

आगीमुळे अन्य बॉयलर फुटत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

Manmad Fire News
Solapur Fire News: सोलापुरात विडी कारखान्याच्या गोदामाला भीषण आग, लाखो रुपयांचा तेंदूपत्ता जळून खाक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com