Hemant Soren Supreme Court Hearing Saam TV
देश विदेश

Hemant Soren Bail : ब्रेकिंग! झारखंडचे माजी CM हेमंत सोरेन यांना दिलासा; हायकोर्टाकडून जामीन

Hemant Soren Land Scam: कथित भुखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंंत होरेन यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे

Pramod Subhash Jagtap

कथित भुखंड घोटाळा प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंंत होरेन यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. सोरेन यांना कथित जमिन घोटाळा प्रकरणात झारखंड हायकोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. १३ जून रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता.

कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा दिलासा दिला आहे. शुक्रवारी न्यायालयाने सोरेन यांना या प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला आहे. १३ जून रोजी या प्रकरणी सुनावणी झाली होती. आज न्यायालयाने आपला निकाल दिला.

३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर मधल्या काळात ते काही दिवस बाहेरही आले होते. आता तब्बल पाच महिन्यानंतर सोरेन यांना हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

दरम्यान, ईडीने अटक केल्यानंतर हेमंत सोरेन यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.तेव्हापासून त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन पक्षाचे कामकाज पाहत आहेत. आता झारखंडमधील विधानसभा निवडणुका तोंडावर असताना हेमंत सोरेन यांना जामीन मंजूर झाल्याने पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: चिंता सोडा, आनंदाची बातमी मिळेल! या 6 राशींना मिळणार मानसिक समाधान, वाचा बुधवारचे राशीभविष्य

एल निनोमुळे खरिपानंतर रब्बी पिकांवरही संकट; देशात अन्नधान्याचा तुटवडा भासणार?

Healthy Lifestyle : सिगारेट-दारूपेक्षाही खतरनाक आहे 'ही' १ गोष्ट, मुंबईच्या प्रसिद्ध डॉक्टरांनी दिला गंभीर इशारा

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

SCROLL FOR NEXT