Jharkhand News
Jharkhand News Saamtv
देश विदेश

Hemant Soren: ED चौकशीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन कुठे गायब झाले? ईडीकडून शोधाशोध, झारखंडचं राजकारण ढवळलं

Gangappa Pujari

Jharkhand CM Hemant Soren News:

झारखंडच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कथित जमीन घोटाळा प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन सध्या ईडीच्या रडारवर आहेत. आज (३०, जानेवारी) हेमंत सोरेन यांची ईडीकडून चौकशी होणार होती. मात्र गेल्या २४ तासांपासून हे यांचमंत सोरेन यांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

ईडीची टीम दिल्ली पोलिसांसह सोमवारी (29 जानेवारी, 2024) झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत (Hemant Soren) सोरेन यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी पोहोचली होती. मात्र ते त्यांच्या निवासस्थानात नव्हते. तब्बल तेरा तास ईडीच्या पथकाने हेमंत सोरेन यांच्या घरी तळ ठोकला होता, मात्र त्यांचा कोणताही ठावठिकाणा नसल्याचे सांगण्यात येत आहे.

तपास यंत्रणांनी झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून एक बीएमडब्ल्यू कार (हरियाणा क्रमांकावर नोंदणीकृत) जप्त केली आहे आणि काही कागदपत्रेही जप्त केली आहेत. अशातच मुख्यमंत्री सोरेन हे अटकेच्या भितीने फरार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना झारखंड मुक्ती मोर्चाने (जेएमएम) ईडीची कारवाई हेमंत सोरेन यांना बदनाम करण्याचा नियोजित कट असल्याचे म्हटले आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

31 जानेवारीला सोरेन आपल्या निवासस्थानी चौकशीसाठी उपलब्ध असतील असे त्यांच्या कार्यालयाने ईमेलद्वारे ईडीला कळवले आहे. हेमंत सोरेन यांनी ईडीला सातत्याने उत्तर दिले आहे. 31 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता राहत्या घरी जबाब नोंदवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री हेमंत सोरेन मिळत नसल्यामुळे ईडीने विमानतळावर अलर्ट जारी केला आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikita Dutta: जरतारी काठ, नऊवारी थाट! निकिता दत्ताचा मराठमोळा लूक

Old Pension Video: कर्मचारी 10 अन् सरकार भरणार 14 टक्के! जुन्या पेन्शनला सरकारचा नवा पर्याय

T20 World Cup: टी -२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावणारे खेळाडू

Crocodile Video: चिपळुणमध्ये महाकाय मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, नागरिकांची भीतीनं गाळण

Jayant Patil: १६ महिन्यात राज्यात ३००० हून अधिक शेतकऱ्यांनी संपवलं जीवन, विधानसभेत जयंत पाटील संतापले

SCROLL FOR NEXT