Arvind Kejriwal  Saam TV
देश विदेश

Arvind Kejriwal News: ब्रेकिंग! अरविंद केजरीवाल यांच्याकडून ED च्या अटकेविरोधातील याचिका मागे

Delhi CM Arvind Kejriwal Arrested: मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे.

Gangappa Pujari

प्रमोद जगताप, दिल्ली|ता. २२ मार्च २०२४

Arvind Kejariwal News:

कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीने अटक केली आहे. या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र अरविंद केजरीवाल यांच्याकडून आता सुप्रीम कोर्टात दाखल केलेली ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गुरुवारी ईडीकडून अटक करण्यात आली. या अटकेविरोधात केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणीही होणार होती. त्याआधीच ही याचिका मागे घेण्यात आली आहे.

अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयाला रिमांडच्या विरोधात असलेली आमची याचिका मागे घेत आहोत, असल्याचे सांगितले आहे. आता ते या अटकेविरोधात कनिष्ठ न्यायालयात दाद मागणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान,  मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर आपचे नेते तसेच कार्यकर्ते आक्रमक झाले असून राज्यात विविध ठिकाणी भाजपविरोधात आंदोलने सुरू केली आहेत. पुणे, मुंबई, सोलापूरमध्ये आप कार्यकर्त्यांकडून भाजपविरोधात निदर्शने करण्यात येत आहेत. अनेक ठिकाणी आप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leopard Terror in AhilyaNagar: जुन्नरनंतर आहिल्यानगरमध्ये बिबट्याची दहशत; बिबट्याच्या हल्ल्यात 4 वर्षांच्या बालिकेचा मृत्यू

Maharashtra Live News Update: खगोलशास्त्रातील आणखी एक तारा हरपला

Maharashtra : EWS आणि BPL वीज ग्राहकांना, २५ वर्ष मोफत वीज मिळणार |VIDEO

Sanjay Raut : संजय राऊतांची भावनिक पोस्ट; हॉस्पिटलमध्येही थांबली नाही लेखणी

Actress Hospitalised: डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; 'या' आजारामुळे केलं रुग्णालयात दाखल

SCROLL FOR NEXT