Rahul Gandhi Latest News SAAM TV
देश विदेश

Rahul Gandhi News : राहुल गांधींना मोठा दिलासा! मानहानीच्या खटल्यात जामीन मंजूर; काय आहे ६ वर्षांपूर्वीचं प्रकरण?

Rahul Gandhi Granted Bail : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तरप्रदेशच्या सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. २०१८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरुन दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे.

Gangappa Pujari

Rahul Gandhi News:

काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर जिल्हा न्यायालयाने (District Court) मोठा दिलासा दिला आहे. २०१८ मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरुन दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधी यांना जामीन मंजूर झाला आहे. आज 'भारत जोडो न्याय यात्रा' स्थगित करुन राहुल गांधी हे न्यायालयात हजर होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना मानहानीच्या खटल्यात जामीन मिळाला आहे. राहुल गांधी यांना 25 हजार रुपयांच्या जामिनावर आणि 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. मंगळवारी ते उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील स्थानिक न्यायालयात हजर होते.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली 'भारत जोडो न्याय यात्रा' (Bharat Jodo Nyay Yatra) सध्या उत्तर प्रदेशात आहे. मंगळवारी राहुल गांधी यांनाी न्यायालयात जावे लागणार असल्याने ही यात्रा काही तास थांबवण्यात आली. काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते जयराम नरेश यांनी 'भारत जोडो न्याय यात्रा मंगळवारी सकाळी काही काळ थांबेल, कारण राहुल गांधींना मानहानीच्या खटल्यात सुलतानपूरच्या स्थानिक न्यायालयात हजर व्हायचे असल्याचे सांगितले होते.

. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय आहे सहा वर्ष जुने प्रकरण?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुलतानपूर न्यायालयाने 20 फेब्रुवारी 2018 रोजी एका प्रकरणात समन्स बजावले आहे. राहुल यांनी 2018 मध्ये बेंगळुरूमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विजय मिश्रा यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.

याबाबत बोलताना विजय मिश्रा म्हणाले की, ही घटना घडली तेव्हा मी भाजपचा जिल्हा उपाध्यक्ष होतो. राहुल गांधी यांनी अमित शहा यांना बेंगळुरूमध्ये खुनी म्हटले होते. जेव्हा मी त्यांच्या आरोपांबद्दल ऐकले तेव्हा मला खूप वेदना झाल्या कारण मी पक्षाचा कार्यकर्ता आहे. मी माझ्या वकिलामार्फत तक्रार दाखल केली असून हे प्रकरण गेल्या ५ वर्षांपासून सुरू आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8 Hour Sleep: शरीराला ८ तासाच्या झोपेची आवश्यकता का आहे? वाचा महत्वाचे कारण

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

SCROLL FOR NEXT