Bomb Threat in Indigo Delhi Varanasi Flight PTI
देश विदेश

Shocking News : दिल्ली-वाराणसी विमानात बॉम्ब ठेवल्याचा फोन; प्रवाशांनी खिडकीतूनच मारल्या उड्या, धक्कादायक VIDEO

Bomb Threat in Indigo Delhi Varanasi Flight : विमानात बॉम्ब असल्याचं कळताच प्रवासी चांगलेच धास्तावले. काहींनी जीव वाचवण्यासाठी विमानाच्या खिडकीतूनच बाहेर उड्या मारल्या

Satish Daud

राजधानी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानात बॉम्ब ठेवला आहे, असा धमकीचा फोन पोलिसांना आला. त्यानंतर प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. तातडीने या विमानाचं उड्डाण थांबवण्यात आलं. पोलिसांसह बॉम्बशोधक पथक विमानतळावर दाखल झालं. विमानात बॉम्ब असल्याचं कळताच प्रवासी चांगलेच धास्तावले.

काहींनी जीव वाचवण्यसाठी खिडकीतून बाहेर उड्या मारल्या. या थरारक घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या घटनेनंतर बॉम्बशोधक पथक विमानतळावर दाखल झालं असून सर्व प्रवाशांना इमर्जन्सी गेटमधून बाहेर काढण्यात आलं आहे. विमानातील सर्व प्रवासी तसेच क्रू मेंबर सुरक्षित आहेत.

सध्या बॉम्बशोधक पथकाकडून विमानाची तपासणी केली जात आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "मंगळवारी पहाटे इंडिगो विमान दिल्लीहून वाराणसीला जाणार होते. सर्व प्रवासी चेकींग करून विमानात बसले होते".

"विमान उड्डाण भरणार इतक्यात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास एका अज्ञात नंबरवरून इंडिगो कार्यालयात फोन आला. विमानात बॉम्ब ठेवला असल्याचं या व्यक्तीने सांगितलं. आम्ही याची माहिती तातडीने पोलिसांना दिली".

दरम्यान, पोलीस बॉम्बशोधक पथकासह विमानतळावर दाखल झाले. इंडिगोच्या क्रूने अलर्ट जारी करत प्रवाशांना विमानातून उतरण्याची विनंती केली. मात्र, प्रवासी चांगलेच धास्तावले. काहींनी आपत्कालीन गेटवरून तर काहींनी फ्लाइटच्या खिडकीतून खाली उड्या मारायला सुरुवात केली.

सर्वांना इमर्जन्सी गेटमधून बाहेर काढण्यात आलं असून सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमानाची तपासणी केली जात आहे. दरम्यान, बॉम्बशोधक पथकाने विमानाची झडती घेतली असता कुठेही बॉम्ब आढळून आला नाही. त्यामुळे प्रवाशांनी घाबरून जाण्याचं कारण नाही, असं सांगण्यात आलं आहे. सध्या पोलिसांकडून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aayush Komkar: क्लासवरून घरी येत होता, बेसमेंटमध्ये दोघांकडून अंदाधुंद गोळीबार; आयुष कोमकर हत्या प्रकरणात मोठी अपडेट

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानरपालिकेत नोकरीची संधी; या पदांसाठी भरती सुरु; अर्ज कसा करावा?

Mandarmani Beach : पर्यटकांना भुरळ घालणारा मंदारमणी बीच, पावसाळ्यात खुलते सौंदर्य

SCROLL FOR NEXT