BS Yediyurappa's Granddaughter Dies Saam Tv
देश विदेश

BS Yediyurappa's Granddaughter Dies: बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या यांची गळफास घेऊन आत्महत्या

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांची नात सौंदर्या यांनी बेंगळुरू येथील एका खाजगी अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

वृत्तसंस्था

कर्नाटक: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे दिग्गज नेते बीएस येडियुरप्पा (BS Yeddyurappa) यांची नात सौंदर्या (Soundarya) यांनी आज शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्या 30 वर्षांच्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या बोअरिंग आणि लेडी कर्झन हॉस्पिटलमध्ये त्यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. बीएस येडियुरप्पा यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सौंदर्या बंगळुरूच्या एमएस रमैया हॉस्पिटलमध्ये डॉक्टर होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या पती आणि सहा महिन्यांच्या बाळासोबत शहरातील माउंट कार्मेल कॉलेजजवळील एका अपार्टमेंटमध्ये राहत होत्या.

तर, दोन वर्षांपूर्वीच सौंदर्या यांचे लग्न झाले होते. आज शुक्रवारी सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला असून मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ते शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी बोरिंग रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. बंगळुरूच्या हाय ग्राउंड पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सौंदर्या या येडियुरप्पा यांची पहिली मुलगी पद्मा यांची मुलगी होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे. भाजपचे दिग्गज नेते येडियुरप्पा यांचे सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांसह रुग्णालयात पोहोचले आहेत अशी माहिती आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयात केलं हजर

Mumbai Crime : फैय्याजला मुंबईतील ३० हजार नागरिकांना का मारायचं होतं? चौकशीदरम्यान सांगितलं खरं कारण

Gold Rate Today: वटपौर्णिमेच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, 10 तोळा 9300 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

Sleep health: नाईट शिफ्ट आणि रात्री जागरणामुळे शरीरात नेमकं काय घडतंय? डॉक्टरांनी सांगितलं धक्कादायक सत्य

डायबिटीजचे रूग्ण फणस खाऊ शकतात का?| Jackfruit Eat In Diabetes?

SCROLL FOR NEXT