Turkey Pakistan Alliance Saam Tv
देश विदेश

Turkey Pakistan Alliance: तुर्की पाकसोबत, भारताचा ट्रेड स्ट्राईक; व्यापाऱ्यांनी केली तुर्कीची नाकेबंदी

India vs Pakistan : पहलगाम हल्ला करुन भारताच्या काळजावर ओरखडा ओढणाऱ्या पाकिस्तानसोबत तुर्की उभा राहिला. एवढंच नाही तर पाकला भारताविरोधात लष्करी मदतही केली. त्यामुळेच भारताने तुर्कीवर ट्रेड स्ट्राईक आणला आहे.

Priya More

भरत मोहोळकर, साम टीव्ही

दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला पाठींबा देणाऱ्या तुर्कीला आता भारतानं चांगलाच दणका दिलाय. त्यामुळं आता तुर्कस्थानचं काही खरं नाही. हे आम्ही का म्हणतोय. भारतानं तुर्कीला कसा दणका दिलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

पहलगाम हल्ला करुन भारताच्या काळजावर ओरखडा ओढणाऱ्या पाकिस्तानसोबत तुर्की उभा राहिला.. एवढंच नाही तर पाकला भारताविरोधात लष्करी मदतही केली. त्यामुळंचं देशभरात बॉयकॉट तुर्की म्हणत बहिष्काराचं अस्त्रं उगारलंय.. त्यामुळं तुर्कीची पुरती नाकेबंदी झालीय...

हा व्हिडीओ पाहा..पर्यटकांनी गजबजलेलं हे बेट आहे तुर्कस्तानमधील... मात्र आता हे बेट ओसाड पडणार आहे.. कारण भारतीय पर्यटकांनी दहशतवाद्यांना पाठींबा देणाऱ्या तुर्कीच्या पर्यटनावर बहिष्कार टाकलाय...

एवढंच नाही तर भारतीय व्यापाऱ्यांनीही तुर्कस्तानवरुन आयात कऱण्यात येणाऱ्या सफरचंद आणि मार्बलची आयात बंद केलीय. दुसरीकडे भारतीय विमानतळांवर असलेली तुर्कीचे कंत्राट रद्द कऱण्याची मागणी कऱण्यात आलीय.. याबरोबरच भारतानं तुर्कीवर डिजिटल स्ट्राईक करत टीआरटीओचं अकाऊंटही रद्द केलंय.

खरंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर तुर्की आणि अझरबैजाननं दहशतवाद्यांचा आका असलेल्या पाकिस्तानला पाठींबा दिला. एवढंच नाही तर भारताविरोधात ड्रोन, मिसाईल, युद्धनौका पाठवल्या. नेमकं हेच राष्ट्रप्रेमी भारतीयांना खटकलं आणि देशात बहिष्कारास्त्र सुरु झालं. त्यामुळं आता तुर्कीचं कंबरडं मोडणार आहे. दरवर्षी 3 लाख 30 हजार भारतीय पर्यटक तुर्कीला जातात. भारतीय पर्यटकांकडून तुर्कीला 3100 कोटींचा नफा होतो. तुर्कीतून संगमरवरी आणि फळांची 31 हजार कोटींची आयात केली जाते.

तुर्कीला मुस्लीम देशांचा खलिफा व्हायची इच्छा आहे. त्यामुळे तुर्कीनं दहशतवादी पाकला पाठींबा दिला. दहशतवाद आणि व्यापार सोबत होऊ शकत नाही हे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट सांगितलंय. त्यामुळंच भारताच्या वाईटावर टपलेल्या तुर्कीसारख्या डोमकावळ्यांना ट्रेड स्ट्राईक हा फक्त इशारा आहे. त्यामुळं तुर्कीनं आतातरी दहशतवाद्यांच्या जळत्या घरापासून अंतर राखावं नाहीतर दहशतवादाविरोधातील लढाईत तुर्कीचाही बळी जाणार हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: 'या' राशींसाठी महत्त्वाचे निर्णय मार्गी लागतील; वाचा राशीभविष्य

Ganpati Visarjan 2025: अनंत चतुर्दशीच्या दिवशी बनतोय दुर्मिळ संयोग; 'या' गोष्टी दान करणं मानलं जातं शुभ

Bhiwandi Accident: देवदर्शनावरून घरी परतताना काळाचा घाला; मुंबई-नाशिक महामार्गावर दुचाकीचा अपघात, बापलेकीचा मृत्यू

Leopard Attack: मैत्रीला जागला...! बिबट्याचा कुत्र्यावर हल्ला, श्वानाच्या निडर मैत्रीसमोर बिबट्याची माघार Video Viral

IPS Anjana Krishna: आधी वाद नंतर अजितदादांची स्पष्टीकरणाची पोस्ट; उपमुख्यमंत्र्यांनाच पॉवर दाखवणारी अंजली कृष्णा नेमक्या कोण?

SCROLL FOR NEXT