Mumbai High Court Saam Tv
देश विदेश

मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयाने मागितले उत्तर, नेमकं काय आहे प्रकरण?

मुंबई उच्च न्यायालयाने भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि डीसीजीआय प्रमुखांना नोटीस पाठवली आहे.

साम वृत्तसंथा

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) भारत सरकार, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स आणि डीसीजीआय प्रमुखांना नोटीस पाठवली आहे. दिलीप लुणावत नावाच्या व्यक्तीने यांच्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्ते लुणावत त्यांची मुलगी डॉ. स्नेहल लुणावत यांचा कोरोना लस कोविशील्डच्या दुष्परिणामांमुळे मृत्यू झाला असल्याचा आरोप या याचिकेत केला आहे. आता यावर त्यांनी एक हजार कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

दिलीप लुणावत यांनी आपल्या याचिकेत सरकार आणि या इतरांवर कोविड लसीशी संबंधित दिशाभूल करणारे तथ्य पसरवल्याचा आरोप केला आहे. या लसीच्या सुरक्षिततेबाबत चुकीचे दावे करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) याचिकेशी संबंधितांकडून उत्तरे मागवली आहेत.

याचिकाकर्ते दिलीप लुणावत हे औरंगाबादचे रहिवासी आहेत. आपली मुलगीही डॉक्टर असल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्या एमएमबीटी डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, धामणगाव येथे वरिष्ठ लेक्चरर होत्या. वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगण्यात आले. त्यानंतर त्यांच्या मुलीलाही ही लस घ्यावी लागली.

स्नेहल यांनी २८ जानेवारी २०२१ रोजी लस घेतली. काही दिवसांनंतर, स्नेहल यांना डोकेदुखी आणि उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत असल्याचे त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले. स्नेहल यांचा १ मार्च २०२१ रोजी मृत्यू झाला. या मृत्यूचे कारण लसीचा दुष्परिणाम असल्याचा दावा करण्यात आला आहे, असं या याचिकेत म्हटले आहे.

पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरला होणार

न्यायमूर्ती एसव्ही गंगापूरवाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने २६ ऑगस्ट रोजी याचिकेवर सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली. १७ नोव्हेंबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणानंतरच्या प्रतिकूल घटनांवरील केंद्र सरकारच्या समितीने सादर केलेल्या अहवालावर ही याचिका आधारित आहे. याचिकेत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून १,००० कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Yoga: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? मग रोज करा 'ही' सोपी योगासने

Alpha Box Office Collection : 'अल्फा'नं पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी, आलिया-शर्वरीच्या ॲक्शन अन् ग्लॅमरची जादू फेल? वाचा कलेक्शन

School Closed: मुसळधार पावसाचा कहर! मुंबई ठाण्यासह 'या' ठिकाणी आज शाळांना सुट्टी, प्रशासनाचे आदेश

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा! मुंबई पुण्यासह कोकणात आज 'रेड अलर्ट; मुसळधार पावसाचा इशारा

Chia Seeds vs Saunf Water: चिया सीड्स की बडीशेपचे पाणी; वजन कमी करण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट?

SCROLL FOR NEXT