लखनऊ : उत्तर प्रदेशातील लखनऊ आणि उन्नावच्या नवाबगंज येथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात लखनऊमधील मादियानव पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल होताच पोलीस धमकी देणाऱ्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. (Bomb Threat To RSS Offices Marathi News)
सूत्रांच्या माहितीनुसार सोमवारी रात्री 8 वाजता लखनऊ आणि उन्नाव येथील युनियन ऑफिसला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या लिंकद्वारे ही धमकी देण्यात आली होती. सध्या पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
दरम्यान, हे सगळे मेसेज अलीगंज येथे राहणाऱ्या नीळकंठ मणी पुजारींना पाठविले गेलेत . यामध्ये लखनऊ, उन्नावमधील नवाबगंज आणि कर्नाटकातील चार ठिकाणी संघाच्या कार्यालयांचा समावेश आहे. धमकीचा मॅसेज प्राप्त होताच नीलकंठ तिवारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे.
डॉ नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. ते अलीगंज येथील RSS बरोबर देखील जोडले गेलेले आहेत. तसेच आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत. रविवारी (5 मे) रात्री त्यांना एका परदेशी मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपवर मेसेज आला. त्यात हिंदी, इंग्रजी आणि कन्नड भाषेत धमक्या देण्यात आल्या आहेत. तुमचे सहा पक्ष कार्यालय बॉम्बने उडवले जाईल. शक्य असल्यास, स्फोट थांबवा. अशी धमकी या मॅसेजमधून देण्यात आली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.