Bomb Threat In Indigo Flight  Saam Tv
देश विदेश

Bomb Threat: चेन्नईहून निघालेल्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Bomb Threat In Indigo Flight Emergency Landing In Mumbai: इंडिगो विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबईत इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Rohini Gudaghe

चेन्नईहून येणाऱ्या इंडिगोच्या विमानाचं मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. कारण विमानामध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, याविमानात १७२ प्रवासी आणि क्रू मेंबर्स होते. इंडीगोने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रवाशांना विमानातून व्यवस्थित खाली उतरवण्यात आलं आहे. या विमानाची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

इंडिगोने शनिवारी (१ जून) एक निवेदन जारी केलं होतं. त्यात म्हटलंय की, चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी (Bomb Threat In Indigo Flight) मिळाली होती. त्यानंतर क्रूने प्रोटोकॉलचे पालन केलं. सुरक्षा एजन्सीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार की, या विमानाची अजूनही चौकशी सुरूच आहे. सर्व सुरक्षा तपासण्या पूर्ण झाल्यानंतर, विमान पुन्हा टर्मिनल परिसरात नेण्यात येणार होते. विशेष म्हणजे एका आठवड्यात इंडिगोच्या विमानाला बॉम्बची (Bomb Threat) ही दुसरी धमकी मिळाली आहे. यापूर्वी २८ मे रोजी दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या विमानाला देखील बॉम्बची धमकी मिळाली होती.

याबाबत दिल्ली अग्निशमन सेवेने माहिती दिली की, २८ मे रोजी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानामध्ये (Indigo Flight) बॉम्ब असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर तातडीने रिस्पॉन्स टीम घटनास्थळी दाखल झाली. विमानाच्या आपत्कालीन गेटमधून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं होतं. दरम्यान, काही प्रवासी घाबरले होते. त्यामुळे त्यांनी विमानातून खाली उड्या मारायला सुरुवात केली होती.

विमानाची पाहणी करण्यासाठी त्याला विमानतळाच्या एका रिकाम्या भागात नेण्यात आलं होतं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या विमान सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, टेक ऑफ करण्यापूर्वी दिल्ली वाराणसी इंडिगो (Crime News) फ्लाइटच्या क्रूला विमानाच्या टॉयलेटमध्ये एक नोट सापडली होती. त्यावर 'बॉम्ब'चा उल्लेख केलेला होता. त्यामुळे मोठी विमानात मोठी खळबळ उडाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking News : शेतजमिनीसाठी बनला हैवान; आईच्या हत्येनंतर मुलानं स्वत:लाही संपवलं

Lazy People: आळशी लोकांमध्ये असताता या सात सवयी, तुमच्याही सवयी अशा आहेत का?

Maharashtra Live News Update: नांदेडमध्ये विमानतळ पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगाराला घेतलं ताब्यात

Raksha Bandhan 2025: प्रत्येक भावाने बहिणीसाठी कराव्यात या ५ गोष्टी

बॉयफ्रेंडच्या प्रेमात वेडीपिशी; नवऱ्याची हत्या करताना फक्त बघत राहिली, चिमुकलीच्या जबाबामुळे भंडाफोड

SCROLL FOR NEXT