Amritsar Saam
देश विदेश

Amritsar Blast: बॉम्ब ठेवायला गेला अन् हातातच फुटला; एक ठार, अमृतसरमध्ये भीतीचे वातावरण

Amritsar Bomb Explosion: अमृतसरच्या मजिठा रोड बायपास परिसरात २७ मे २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता झालेल्या स्फोटात एक दहशतवादी ठार झाला आहे.

Bhagyashree Kamble

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. पाकिस्तानकडून होणारे हल्ले भारताने थोपवले. दोन्ही देशाकडून युद्धबंदी जाहीर झाली असून, भारत - पाकिस्तानमध्ये सध्या शातंता आहे. अशातच अमृतसरमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमृतसरमध्ये बॉम्बस्फोट करण्याचा प्रयत्न एकाचा फसला आहे. बॉम्ब ठेवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या अमृतसरमधील नौशेरा गावाजवळ सकाळी हा स्फोट घडला. २७ मे रोजी सकाळी ९:३० वाजता हा स्फोट झाला. स्फोट घडविण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या हातात बॉम्ब होता. मात्र, त्याच्या हातातच बॉम्ब फुटल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, स्फोट घडवणारा व्यक्ती गंभीर जखमी झाला असून, त्याचे दोन्ही हात निकामी झाले असल्याचे सांगण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात जखमी झालेल्या व्यक्तीचा रूग्णालयात उपचारादरम्यान, मृत्यू झाला.

हा स्फोट घडल्यानंतर आवाज ऐकून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. स्थानिकांनी या घटनेबाबत माहिती देताना सांगितले की, 'आम्हाला सकाळी नऊच्या सुमारास स्फोटाचा आवाज आला. आम्ही तातडीने घटनास्थळी धावत गेलो. त्या ठिकाणी एक व्यक्ती गंभीररित्या जखमी होऊन पडला होता. त्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. रूग्णवाहिकेलाही बोलावून घेतलं, सध्या तपास सुरू आहे'.

पोलिसांनी काय सांगितलं?

दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली, यासंदर्भात पोलीस उपनिरीक्षक सतींदर सिंग यांनी सांगितलं की, 'जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तो एका दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याची माहिती आहे. तो स्फोटकांचा साठा परत घेण्यासाठी आला होता. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. '

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

Gopichand Padalkar : हिंदू मुलींविषयी तालिबानी मानसिकतेचं वक्तव्य, भाजप नेते पडळकर नेमकं काय म्हणाले?

Virat Kohli : विराटचा पाकच्या झेंड्यावर ऑटोग्राफ? व्हायरल फोटोमागचं सत्य काय?

Maharashtra Live News Update : ठाकरेंची नवी युवा पिढी एकाच फ्रेममध्ये

Diwali Rangoli Design: दिवाळीत दारासमोर काढा या सुंदर अन् सोप्या रांगोळी, घराला येईल शोभा

SCROLL FOR NEXT