Fake doctor Madhya Pradesh News : बोगस डॉक्टरामुळे ७ जणांचा जीव गेल्याचं भयंकर प्रकरण समोर आले आहे. लंडनमधील डॉक्टर असल्याचे बातवणी केली, रूग्णालयात त्याने अनेक हृदयरुग्णांवर शस्त्रक्रिया केली, त्यामध्ये सात जणांचा मृत्यू झालाय. मध्य प्रदेशमधील दमोह येथील मिशन रुग्णालयातून निष्काळजीपणाचा हा संतप्त प्रकार समोर आलाय.
रूग्णालय आणि डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे 7 हृदयविकाराच्या रुग्णांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मिशन रूग्णालयात एक व्यक्ती स्वतःला लंडनचा डॉक्टर सांगून नोकरी करत होता. त्या बोगस डॉक्टरांनी हृदयरुग्णांवर शस्त्रक्रियाही केल्या. त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे, हा बोगस डॉक्टर लंडनच्या डॉक्टर एनकेम जॉन यांच्या नावाने नोकरी करत होता.
मिशन रुग्णालयामध्ये फेब्रुवारी महिन्यात हा प्रकार घडला आहे. बोगस डॉक्टराने अनेक हृदयरुग्णांच्या शस्त्रक्रिया केल्या. त्यामध्ये सात रूग्णांचा जीव गेला. धक्कादायक म्हणजे, या गंभीर प्रकरणानंतरही रुग्णालय प्रशासनाने आरोपीच्या पदवीची पडताळणी केली नाही. त्या बोगस डॉक्टराची चौकशी केली नाही. बाल कल्याण समितीचे अध्यक्ष दीपक तिवारी यांनी तक्रार केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
सरकारी पैशांचा वापर, तिवारींचा गंभीर आरोप
या धक्कादायक प्रकरणाच्या तपासात निष्काळजीपणा दाखवला गेल्याचा आरोप दीपक तिवारी यांनी केला. मार्च महिन्यात याची तक्रार मानवाधिकार आयोगाकडे करण्यात आली. तपासादरम्यान असा संशयही व्यक्त केला जात आहे की मृतांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते, असेही तिवारी म्हणाले. दरम्यान, बाल संरक्षण आयोगाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी या प्रकरणाचा संपूर्ण घटनाक्रम सोशल मीडियावर टाकला, त्यावेळी हे प्रकरण आणखी जास्त चर्चेत आले. मिशन रुग्णालय पंतप्रधान आयुष्मान भारत योजनेशी जोडलेले आहे, ज्यामुळे सरकारी निधीच्या गैरवापराचा आरोप करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू असून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.