chatapuja incident Saam tv
देश विदेश

Shocking : छठ पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

chatapuja incident : उत्तर प्रदेशमध्ये छठ पूजेच्या कार्यक्रमादरम्यान विपरीत घडलं. सेल्फी घेताना होडी नदीत बुडाली. त्यानंतर तिघे तरुण पाण्यात बुडाले.

Vishal Gangurde

चंदौलीत छठ पूजेच्या कार्यक्रमादरम्यान होडी उलटली

सेल्फी घेताना घडली दुर्घटना

४ लोकांना स्थानिकांनी वाचवण्यात यश, इतरांचा शोध सुरू

चंद्रप्रभा नदीत ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ

छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशमध्ये मोठी दुर्घटना घडली. उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे सेल्फी घेताना होडी उलटल्याची घटना घडली. यादरम्यान होडीत सेल्फी घेणार तरुण नदीत बुडाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर किनाऱ्यावरील काहींनी वाचवण्यासाठी नदी उड्या मारल्या. त्यातील ४ जणांना वाचवण्यात यश आलं आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे.

उत्तर प्रदेशातील बबुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोदोचक गावात ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार,चंद्रप्रभा नदीजवळ छट पूजेसाठी हजारो लोक आले होते. यावेळी नदीत एक होडी होती. या नदीतील होडीत काही तरुण चढले.

होडीत चढलेल्या लोकांनी सेल्फी काढायला सुरुवात केली. लोकांची गर्दी झाल्याने होडी डगमगू लागली. पुढे होडी उलटल्याने तरुण नदीत बुडाले. या घटनेनंतर नदीत बुडालेल्या लोकांची एकच आरडाओरड सुरु झाली.

घटनेनंतर नदीजवळ उपस्थित लोकांनी तातडीने तरुणांना वाचवण्यासाठी नदीत उडी मारली. नदीजवळील ग्रामस्थांनी ४ लोकांचा जीव वाचवला. तर या दुघटनेत तिघे जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळाली आहे. नदीत बुडालेल्या लोकांचा शोध घेण्याचं काम सुरु आहे.

बिहारमध्ये नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू

बिहारच्या भागलपूरमध्ये छठ पूजेदरम्यान ४ लहान मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. नदीत आंघोळ करण्यासाठी नदीत उतरले. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. दोन मुले अद्याप बेपत्ता आहे. त्यांना शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेत. चौघांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : दीड वर्षापूर्वी लग्न, आता अपघातात मृत्यू, पुण्यात एसटी बसने उड्डाणपूलावर राजाला उडवले

IND vs NZ: श्रेयस की इशान, तिलक वर्माच्या जागी कोण खेळणार? सूर्याने २ वाक्यात विषय संपवला अन् कारणही सांगितलं

Akola : वाह रे पठ्ठया! अकोल्यात 'रूग्णसेवक' बनला 'नगरसेवक'; वाचा संपूर्ण प्रवास

Long And Short Haircuts: लांब आणि छोट्या केसांसाठी हे आहेत 5 ट्रेडिंग हेअरकट्स, एकदा नक्की ट्राय करा

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट! २०२६ मध्ये पगारवाढ नाहीच; कधी येणार एरियर?

SCROLL FOR NEXT