BJP LEADER MITHILESH YADAV SHOT DEAD IN JHARKHAND saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याची गोळ्या झाडून हत्या; राजकारणात मोठी खळबळ

BJP Youth Morcha Leader Mithilesh Yadav Shot Dead In Giridih Jharkhand: झारखंडमधील गिरिडीहच्या बगोदर येथे भाजयुमो नेते मिथिलेश यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हेसला राष्ट्रीय महामार्गावर त्यांचा मृतदेह आढळला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील बगोदर येथे धक्कादायक घटना घडली आहे. हेसला येथील राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध भाजप युवा मोर्चाचे नेते मिथिलेश यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या डोक्याच्या मध्यभागी गोळी झाडण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

हेसला राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध मिथिलेश यादव यांचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. बगोदरच्या प्रमुख आशा महतो यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. संतप्त नागरिकांनी मिथिलेश यादव यांचा मृतदेह महामार्गावर ठेवून रस्ता रोखून ठेवला.

घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस धनंजय राम हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांना समजावून सांगत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथिलेश यादव हे हेसला गावचे रहिवासी होते. राष्ट्रीय महामार्गालगत त्यांचे सर्व्हिस सेंटरचे दुकान होते. गुरुवारी रात्री त्यांनी आईला दुकानातच झोपण्यासाठी जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडले.

मात्र, शुक्रवारी सकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना त्यांचा मृतदेह राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध आढळून आला. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, मिथिलेश यादव यांची हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणातून केली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govinda: 'लोकांना काय प्रोब्लेम आहे कळत नाही...'; कोमल राणीसोबतच्या नात्यावर गोविंदा स्पष्ट बोलला

Gangajal Vastu Tips: घरामध्ये गंगाजल ठेवताना 5 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा

PM मोदींचा महिलेसोबतचा फोटो केला शेअर; उच्च न्यायालयाची अभिजीत दीपकेंसह CJPच्या कार्यकर्त्यांना नोटीस

Skin Care: टॅनिंग आणि पिग्मेंटेशन कमी करण्यासाठी घरीच तयार करा व्हिटॅमिन C फेस मास्क; मिळेल ग्लोईंग स्किन

Maharashtra News Live Update: गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या कार्यक्रमासाठी स्पेनमधील एक कुटुंब मुंबईत आलं

SCROLL FOR NEXT