Punjab SIR controversy Saam Tv
देश विदेश

BJP: भाजपच्या बड्या नेत्याची खासदारकी जाणार? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Punjab SIR controversy: पंजाबमध्ये एसआयआर प्रक्रियेदरम्यान भाजपचे खासदार राघव चड्ढा यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात आले. यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे.

Priya More
  • राघव चड्ढांची राज्यसभा खासदारकी जाण्याची शक्यता

  • राघव चड्ढांचं नाव पंजाबच्या मतदार यादीतून वगळण्यात आले

  • पंजाबच्या मसुदा मतदार यादीत राघव चड्ढांचं नाव नाही

  • राघव चड्ढा आणि पंजाब एसआयआर वाद सुरू

  • राघव चड्ढांच्या आरोपांवर आम आदमी पार्टीचा पलटवार

भाजपचे खासदार राघव चड्ढा यांची खासदारकी जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पंजाबमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान भाजपचे खासदार राघव चड्ढा यांनी गंभीर आरोप केले आहेत. मसुदा मतदार यादीतून आपले नाव वगळल्यानंतर त्यांनी आम आदमी पार्टीच्या सरकारवर राजकीय सूडबुद्धीचा आरोप केला. आम आदमी पार्टीने देखील त्यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. या सगळ्यादरम्यान राघव चड्ढा यांचे राज्यसभेचे सदस्यत्व जाणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

पंजाबमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा एक भाग म्हणून १३ ऑगस्ट रोजी मतदार यादीचा मसुदा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये भाजपचे खासदार राघव चड्ढा यांचे नाव गैरहजर, हस्तांतरित, मृत आणि दुबार या प्रवर्गात समाविष्ट करण्यात आले. या प्रक्रियेअंतर्गत पंजाबच्या २०.६६ लाख मतदारांपैकी अंदाजे ९.७ टक्के मतदारांची नावे मसुदा यादीतून वगळ्यात आली आहेत.

या मसुदा मतदार यादीतून आपले नाव वगळण्यात आल्यानंतर राघव चड्ढा यांनी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करत आप सरकारवर निशाणा साधला. राघव चड्ढा यांनी आप सरकार आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चड्ढा यांनी आरोप केला की, पंजाब सरकारचे पोलिस आणि प्रशासन आप सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांना लक्ष्य करत आहे.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत त्यांनी सांगितले की, लोकप्रतिनिधींसाठी एक संरक्षित यादी आहे. ज्यामुळे दावे आणि आक्षेपांच्या वेळी त्यांची नावे मसुदा यादीत राहतील याची खात्री होते. ज्यावेळी दावे आणि आक्षेपांच्या वेळी त्यांची नावे मसुदा यादीत राहतील याची खात्री होते. त्यांच्याबाबतीत या नियमाचे हेतुपुरस्सर उल्लंघन करण्यात आले आहे. ही फक्त एक मसुदा यादी नाही आणि मी निवडणूक आयोगाकडे आपला आक्षेप नोंदवून अंतिम यादीत त्यामध्ये दुरूस्ती करून घेईन, असे ते म्हणाले.

आम आदमी पार्टीने राघव चड्डा यांचे आरोप फेटाळून लावले असून त्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. 'आप'च्या एका प्रवक्त्याने स्पष्ट केले की, एसआयआर ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे, राज्य सरकारची नाही. कोणाचे नाव वगळायचे किंवा समाविष्ट करायचे, हे सरकार ठरवत नाही. आपने दावा केला की, त्यांना निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे की, राघव चड्डा हे दिल्लीतील राजेंद्र नगरमधून मतदार यादीत पूर्व-दिनांकित प्रक्रियेद्वारे आपले नाव पुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करत आहेत. आपने या बेकायदेशीर प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Maharashtra News Live Update: पुणे- विद्यानंद बापट यांच्या मारहाणीचा गणेश मंडळांनी केला निषेध

Satyendar Jain Granted Bail : भ्रष्टाचार प्रकरणात माजी मंत्र्यांना अखेर जामीन; १६ दिवसांनी येणार तुरुंगाबाहेर

Kidney health: विकेंडला तुम्हालाही या 6 सवयी आहेत का? वाढतोय किडनी फेल होण्याचा धोका

Chapati Tips : चपातीला तूप लावून खाताय? शरीरात होतील 'हे' ७ आश्चर्यकारक बदल, ५ सेकंदात जाणून घ्या

सोसायटीत नॉन व्हेज खाण्यावर, पाळीव प्राण्यांवर बंदी घालता येते का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT