Celebrations turn tragic as BJP leader Kuldeep Sharma dies in a fatal road accident in Noida. saam tv
देश विदेश

निवडणूक विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष; दुसरीकडे पक्षातील दिग्गज नेत्याचा अपघातात मृत्यू, राजकीय वर्तुळात शोककळा

BJP Leader Kuldeep Sharma Accident News In Noida: आसाम आणि पश्चिम बंगालमधील भाजपच्या विजयानंतर देशभर जल्लोष सुरू असताना उत्तर प्रदेशातील भाजप नेते कुलदीप शर्मा यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

Omkar Sonawane

आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याने देशभरातील सर्व भाजप नेत्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. एकीकडे विजयाचे फटाके फुटत असताना दुसरीकडे उत्तरप्रदेशमधील बदाऊनचे भाजप नेते कुलदीप शर्मा यांचे सोमवारी निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी कुलदीप शर्मा हे वैयक्तिक कामासाठी नोएडाला गेले होते. रात्री सुमारे 11 वाजता ते रस्त्याच्या कडेला कोणाचीतरी वाट पाहत उभे होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कॉरपियोकारने त्याच्या बाईकला जोरात धडक दिली.

ही धडक इतकी भयानक होती की मोटारसायकल पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि कुलदीप शर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला असून पुढील तपास सुरू आहे. कुलदीप शर्मा यांचं लग्न नऊ वर्षांपूर्वी झाले होतं, पण त्यांना मुलबाळ नव्हते, त्यांच्या निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

आपल्या राजकीय कारकिर्दीत कुलदीप शर्मा हे भाजपचे निष्ठावन कार्यकर्ता होते. त्यांच्या संघटनात्मक योगदानाची दखल घेऊन पक्षाने 2017 ते 2021 या कालावधीसाठी त्यांच्यावर मंडळ अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. सध्या त्यांच्यावर सोशल मीडिया समन्वयक म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप नेत्यांमध्ये शोककळा पसरली असून पालिया गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सोनं ३ हजारांनी स्वस्त, चांदी ७ हजारांनी घसरली, आठवडाभरात मार्केट जाम, सुवर्णनगरीत आजचा भाव काय?

Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या निवडणूकीत मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत

Bhagyashtree Mote Photos: तुझं सौंदर्य पाहून ओठातून शब्दच फुटेना...

Chanakya Niti: विषासमान असतात या ३ चूका, यशस्वी व्हायचं असेल तर आत्ताच बदला या सवयी

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत अवकाळी पावसाची हजेरी; जनजीवनावर परिणाम

SCROLL FOR NEXT