Ravneet Bittu On Rahul Gandhi Saam Tv
देश विदेश

Rahul Gandhi: 'राहुल गांधी देशाचा नंबर वन दहशतवादी', भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

Ravneet Bittu On Rahul Gandhi: केंद्रीय मंत्री रवनीत सिंह बिट्टू यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

Satish Kengar

केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते रवनीत सिंह बिट्टू यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहू गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राहुल गांधी दहशतवादी असल्याचं रवनीत सिंह बिट्टू म्हणाले आहेत ते म्हणाले आहेत की, ''राहुल गांधींनी शिखांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. शीख कोणत्याही पक्षाशी संबंधित नसून तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राहुल गांधी हे देशातील नंबर एकचे दहशतवादी आहेत.''

ते म्हणाले, जे लोक नेहमी लोकांना मारण्याचा गोष्टी करतात. जहाजे आणि ट्रेन उडवण्याबद्दल धमकी देतात, ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ उतरले आहेत. माझ्या मते, कोणाला पकडण्यासाठी बक्षीस ठेवायला हवे तर ते राहुल गांधी आहेत. राहुल गांधी हे देशाचे सर्वात मोठे शत्रू असल्याचेही ते म्हणाले.

रवनीत सिंह बिट्टू म्हणाले, ''राहुल गांधी हे भारतीय नाहीत. त्यांनी आपला बहुतांश वेळ बाहेर घालवला आहे. त्यांना आपल्या देशावर फारसे प्रेम नाही, कारण ते परदेशात जाऊन सर्व काही चुकीच्या पद्धतीने सांगतात. जे मोस्ट वाँटेड आहेत, फुटीरतावादी आहेत, बॉम्ब, बंदुका आणि शेल बनवण्यात मास्टर आहेत. त्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचे कौतुक केले आहे.''

बिट्टू म्हणाले की, ''राहुल गांधी पहिल्यांदाच संसदेत विरोधी पक्षनेते बनले आहेत. कधी ते शिखांच्या असुरक्षिततेबद्दल बोलतात तर कधी समाजाच्या विघटनाबद्दल बोलतात. त्याचे वर्तन अक्षम्य आहे.''

ते म्हणाले की, मी काँग्रेस खूप जवळून पाहिली आणि तपासली. मी काँग्रेसच्या तिकिटावर तीनदा खासदार झालो आहे. पंतप्रधान मोदींची लोकप्रियता आणि भाजपच्या मूळ मंत्रांनी प्रभावित होऊन भाजपचे सदस्यत्व घेतल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये सहभागी होऊन मी रेल्वे क्षेत्रात देशवासीयांची सेवा करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आंदोलकांना घेऊन जाणाऱ्या बसची चावी घेऊन ठोकली धूम; जंतर-मंतरवर महिलेचं कृत्य पाहून पोलीस चक्रावले, VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणी पप्या शिंदेच्या पोलीस कोठडीत वाढ; 9 ऑक्टोबरपर्यंत कोठडी

Migraine Home Remedies: डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास होताच करा 'हे' ७ घरगुती उपाय; मिळू शकतो झटपट आराम

महाराष्ट्रात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; 2 अधिकाऱ्यांची मंत्रालयातच नियुक्ती, कोणाला कुठे जबाबदारी?

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

SCROLL FOR NEXT