Police investigate the crime scene after BJP leader Ramavatar Aswal was found murdered in a scrap warehouse in Jaipur. saam tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याची गळा कापून हत्या; राजकीय वर्तुळाला हादरा

Ramavatar Aswal BJP Leader Murder In Jaipur Manoharpur: जयपूरमध्ये भाजपचे एससी मोर्चा मंडळ अध्यक्ष रामावतार असवाल यांची गळा कापून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

जयपूरचे भाजप नेते रामवतार असवाल उर्फ पप्पू यांची अतिशय क्रूर हत्या करून त्यांचा मृतदेह एका भंगारच्या गोदामात रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. आस्वाल हे भाजप मोर्चाचे एससी मंडळाचे अध्यक्ष होते. या हत्येच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाली असून त्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या सोमवारी रात्री उशिरा मनोहरपरमध्ये झाली. मनोहरपुरमधील बसस्थानकाजवळील एक भंगार गोदामात रामावतार यांचा मृतदेह आढळला. यावेळी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटणातस्थळी दाखल झाले आणि रामवतार यांना रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले.

रामवतार असवाल हे मनोहरपुरचे रहिवासी होते. रामवतार असवाल उर्फ पप्पू भाजपचे अनुसूचित जाति मोर्चा मंडळाचे अध्यक्ष होते. स्थानिक पातळीवर त्यांची एक सक्रिय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख होती. त्यांच्या हत्येची माहिती मिळताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून संतापाचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी गोदाम आणि आजूबाजूचा परिसर सील करून तपास सुरू केला आहे. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि इतर तांत्रिक तपशिलांच्या आधारे मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे. या हत्येमुळे संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी आणि गावकऱ्यांनी मनोहरपुर पोलीस ठाण्यात जात हत्येकरांना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी धरणे आंदोलन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT