political news :  Saam tv
देश विदेश

भाजपला सर्वात मोठा धक्का; मुख्यमंत्र्यांचं डॅमेज कंट्रोल निष्फळ, माजी मंत्र्याने साथ सोडत काँग्रेसचा 'हात' पकडला

political news : भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतरही माजी मंत्र्याने काँग्रेसचा 'हात' पकडला.

Vishal Gangurde

भाजपला आसाममध्ये बसला मोठा राजकीय धक्का

माजी मंत्री नंदिता गरलोसा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश

तिकीट नाकारल्यामुळे सोडली भाजप

आसाम विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपला मोठा धक्का बसला आहे. हिमंत सरकारमध्ये क्रीडा मंत्री राहिलेल्या नंदिता गरलोसा यांनी अधिकृतरित्या काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपकडून तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. नंदिता आता काँग्रेसकडून हाफलोंग विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे निश्चित झालं आहे.

आसामच्या काँग्रेस कमिटीमधील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत नंदिता गरलोसा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेश महासचिव निर्मल लंहथासा यांनी म्हटलं की, 'आम्हाला आनंद होत आहे की, नंदिता गरलोसा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या ५ वर्षांपासून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात होता. परंतु त्या त्यांच्या सिद्धांतावर ठाम राहिल्या. भाजपला आता त्याची किंमत चुकवावी लागेल. कारण हिमंत बिस्वा सरमा यांना आदिवासी समाजाच्या जमिनी बड्या कंपन्यांना विकण्यात अधिक रस आहे'.

निर्मल पुढे म्हणाले, 'काँग्रेस उद्या त्यांना हाफलोंग विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून घोषित करतील. त्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल'. गरलोसा या आसाम सरकारमध्ये क्रीडा आणि युवा कल्याण मंत्री होत्या. त्या हाफलवोंग विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करत होत्या. भाजपने त्यांच्या ऐवजी रुपाली लांगथासा यांना तिकीट दिलं. त्यामुळे नंदिता यांनी भाजप सोडली.

मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरामा यांनी नंदिता यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर हाफलोंग येथील घरी जाऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काही फायदा झाला नाही. मुख्यमंत्री सरमा यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर काही तासांत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आसाममध्ये १२६ विधानसभा मतदारसंघ आहेत. यासाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope : खर्चावर नियंत्रण ठेवा, ५ राशींच्या व्यक्तींना होणार अचानक धनलाभ; वाचा गुरूवारचे राशीभविष्य

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

SCROLL FOR NEXT