PMK-TVK Alliance Saam tv marathi
देश विदेश

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

PMK-TVK Alliance : तामिळनाडूत मुख्यमंत्री विजय यांच्या TVK आणि PMK यांच्यात संभाव्य आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मंत्रिपदांच्या चर्चेचीही माहिती समोर आली आहे; मात्र PMK नेत्या सौम्या अंबुमणी यांनी मंत्रिपदाबाबतचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Namdeo Kumbhar

PMK TVK Alliance : तामिळनाडूच्या राजकारणात नव्या समीकरणांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री विजय थलपती यांच्या TVK (तमिळगा वेत्री कझगम) पक्षाने 'पट्टाली मक्कल कच्ची' (PMK) या पक्षाला आपल्यासोबत येण्याची ऑफर दिली असल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, PMK पक्षाला विजय यांच्या मंत्रिमंडळात २ मंत्रिपदे देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. पण यासाठी PMK पक्षाला भाजपसोबतची आपली मैत्री तोडावी लागणार आहे. त्यामुळे या संभाव्य युतीकडे संपूर्ण तामिळनाडू राज्याचे लक्ष लागले आहे. (PMK TVK alliance talks latest news Tamil Nadu)

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांचा टीव्हीके आणि पीएमके यांच्यातील संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही पक्षामध्ये मंत्रि‍पदाच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. पीएमके भाजपसोबतची युती तोडणार का? याची चर्चा तामिळनाडूच्या राजकारणात सुरू आहे.

पीएमकेने विधानसभा निवडणुका एआयएडीएमके-भाजपसोबतच्या युतीत लढवल्या होत्या. अंबुमणी रामदास यांच्या नेतृत्वाखालील गटाला १८ विधानसभा जागा मिळाल्या होत्या. यामध्ये त्यांनी ४ जागा जिंकल्या. पण आता पक्षाने ६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या मदुरंतकम आणि धारापुरम पोटनिवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाला पाठिंबा न देण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमकेची ही भूमिका मदुरंतकममध्ये महत्त्वची मानली जात आहे. वन्नियार समाजात असलेल्या पक्षाच्या पाठिंब्याचा एआयएडीएमकेला फायदा झाला असता. पण तिथे टीव्हीके आपले स्थान मजबूत करत असल्याचे दिसत आहे.

इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, दोन्ही पक्षांमधील चर्चा अंबुमणी रामदास आणि मुख्यमंत्री विजय थलपती यांचे राजकीय सल्लागार जॉन अरोकियासामी यांच्यामार्फत होत आहे. या चर्चेत सहभागी असलेल्या वरिष्ठ नेत्यांच्या मते, दोघांमधील राजकीय संपर्क नवीन नाही. अरोकियासामी यांनी २०१६ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पीएमकेच्या राजकीय रणनीतीवरही काम केले होते. अंबुमणी रामदास यांना पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे केले गेले होते आणि "मातरम, मुन्नेत्रम, अंबुमणी" हे प्रचाराचे घोषवाक्य होते. आता, हे राजकीय संबंध संभाव्य सत्तावाटप व्यवस्थेच्या चर्चेपर्यंत विस्तारले आहेत.

विजय यांच्या मंत्रिमंडळात पीएमकेला दोन जागा देण्याचा प्रस्ताव?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सरकारमध्ये पीएमकेला दोन कॅबिनेट पदे देण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू आहे. त्यामध्ये एक कॅबिनेट पद अंबुमणी रामदास यांच्या पत्नी आणि विधानसभेतील पीएमकेच्या गटनेत्या सौम्या अंबुमणी यांना दिले जाऊ शकते. दुसऱ्या पदावर पीएमकेचे आमदार ए. गणेश कुमार यांच्यासाठी चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पोटनिवडणुकीनंतर सौम्या अंबुमणी यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती शिक्षक मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार निश्चित

Walmik Karad: माझ्या मुलाला अडकवण्यासाठी तुरूंगातून कट, बीडच्या खासदारानं थेट वाल्मिक कराडचं संभाषण ऐकवलं

Pakistan Airstrike : पाकिस्तानचा अफगाणिस्तान एअरस्ट्राइक; मध्यरात्रीच्या हवाई हल्ल्यात ५ मुलांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत

Dahi Kadhi Recipe : ना फुटेल, ना चव बिघडेल! एकदा 'अशी' बनवून पाहा दही-कढी

IND vs SL : भारताचा श्रीलंकेवर १२४ धावांनी दणदणीत विजय; अंतिम सामन्यात पाकिस्तानशी महामुकाबला

SCROLL FOR NEXT