BJP Leaders Family in Controversy Saam
देश विदेश

खासदाराच्या बहिणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट, नंतर सासऱ्यानं भररस्त्यावर काठीनं मारलं; व्हिडिओ व्हायरल

BJP Leaders Family in Controversy: भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीवर सासरा आणि दोन दीरांकडून हल्ला. आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करून महिलेला मारहाण केल्याचा आरोप.

Bhagyashree Kamble

भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीवर सासरा आणि दोन दीरांकडून हल्ला.

आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट करून महिलेला मारहाण केल्याचा आरोप.

२१ सेकंदांचा हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

उत्तर प्रदेश फर्रुखाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. फर्रुखाबादचे भाजप खासदार मुकेश राजपूत यांच्या बहिणीने सासरा आणि २ दीरांवर गंभीर आरोप केले आहेत. पीडितेनं आरोप केला आहे की, सासरे आणि २ दीरांनी त्यांचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ शूट केला. नंतर मारहाण केली. पीडितेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पीडित महिला फर्रुखाबाद येथील अवंतीबाई नगर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडित महिला सासरी राहत आहे. पीडितेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, रविवारी आंघोळ करत असताना सासरे लक्ष्मण सिंह आणि दोन्ही दीर (राजेश - गिरीश) आले. ते दडून बसले. त्यांनी पीडितेचा आंघोळ करत असताना व्हिडिओ शूट केला.

व्हिडिओ शूट होत असताना पीडितेनं पाहिलं. त्यांनी तातडीने विरोध केला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी महिलेवर अत्याचार करण्यास सुरूवात केली. महिलेच्या सासऱ्याने पीडितेला रायफलने जीवे मारण्याची धमकी दिली. नंतर दोन्ही दीरांनी महिलेवर चाकूने आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. यामुळे पीडित महिलेला गंभीर दुखापत झाली.

पीडित महिला जेव्हा रस्त्यावर गेली. तेव्हा तिच्या सासऱ्याने महिलेचा पाठलाग केला. नंतर परिसरातील लोकांसमोर काठीनं बेदम मारहाण केली. महिलेच्या दीरानं त्यांची केस ओढले. नंतर जमिनीवर फेकलं. या घटनेचा व्हिडिओ शूट करण्यात आला असून, सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. २१ सेकंदाच्या व्हिडिओत सासरा महिलेवर काठीनं बेदम मारहाण करत असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: वेस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर वाहतुकीवरील तात्पुरते निर्बंध

Jammu and Kashmir: उपराज्यपालांच्या नातवाची आत्महत्या; कानपूरमध्ये सापडला मृतदेह, खिशात सापडली सुसाइड नोट

Chhagan Bhujbal : मोठी बातमी! मंत्री छगन भुजबळ रुग्णालयात दाखल

बेरोजगार तरुणांची फसवणूक थांबवा! बनावट रोजगार ॲप्सवर राम शिंदेंचा कडक इशारा|VIDEO

IAS Officers Transfers: धडाधड IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; ३ आयुक्त आणि १० डीएमसह ४६ अधिकाऱ्यांच्या बदल्या

SCROLL FOR NEXT