Latest Politics News Saam Tv News
देश विदेश

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Latest Politics News: केटीआर यांनी त्यांची बहीण कविता यांच्यावरील चौकशी थांबवण्यासाठी भाजपसोबत युती किंवा विलीनीकरणाचा प्रस्ताव दिला, असा खळबळजनक दावा भाजपचे खासदार सीएम रमेश यांनी केला.

Bhagyashree Kamble

भाजप खासदार सीएम रमेश यांनी केटीआर यांच्यावर भाजपसोबत युतीचा प्रस्ताव दिल्याचा खळबळजनक आरोप केला.

केटीआर यांनी हा आरोप फेटाळत तो पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलं.

केटीआर यांनी रेवंत रेड्डी आणि रमेश यांच्यावर सरकारी प्रकल्प आंध्रातील कंत्राटदारांना देण्याचा आरोप केला.

तेलंगणाच्या राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. भाजपचे खासदार सीएम रमेश यांनी दावा केला की, भारत राष्ट्र समिती (BRS) चे कार्यकारी अध्यक्ष केटी रामा राव (KTR) यांनी त्यांची बहीण कविता यांच्याविरोधात सुरू असलेली ईडी आणि सीबीआय चौकशी थांबवण्याच्या बदल्यात भाजपसोबत युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, केटीआर यांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत.

रमेश म्हणाले, "केटीआर विसरले वाटतं, ते माझ्या दिल्लीतील घरी आले होते. माझ्याकडे त्या भेटीचा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे. तो मी प्रसारमाध्यमांना दाखवू शकतो. त्यांनी स्वतः सांगितलं होतं की, जर चौकशी थांबवली गेली, तर बीआरएसला भाजपमध्ये विलीन करायला ते तयार आहेत," असा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केला.

आरोप पूर्णपणे खोटे अन् निराधार

या आरोपांवर प्रतिक्रिया देताना केटीआर यांनी ते पूर्णपणे खोटे आणि निराधार असल्याचं सांगितलं. "बीआरएस कधीही कोणत्याही पक्षात विलीन होणार नाही," असं ठामपणे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "हे सर्व आरोप आमच्यावरील भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपांपासून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे."

केटीआर यांनी यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सीएम रमेश यांच्यावरही गंभीर आरोप केले. "भाजप आणि काँग्रेस यांच्यात गुप्त करार झाला आहे. तेलंगणातील सरकारी प्रकल्प मुद्दाम आंध्र प्रदेशातील कंत्राटदारांना दिले जात आहेत," असा दावा त्यांनी केला. तसेच, "जर त्यांच्या हिंमत असेल, तर त्यांनी या कथित घोटाळ्यांवर माझ्यासमोर खुली चर्चा करावी," असं ओपन चॅलेंजही केटीआर यांनी दिलं.

दरम्यान, रमेश यांनी सांगितलं की, 'खरंतर केटीआर यांना भीती आहे. तेलंगणामध्ये भाजप आणि टीडीपी यांच्यात युती झाली, तर बीआरएसचं अस्तित्व धोक्यात येईल. आणि म्हणूनच, ते निराधार आणि खोटे आरोप करत आहेत'. दरम्यान, आरोप प्रत्यारोपाच्या फेरीत तेलंगणातील राजकारण पेटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणात अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! नवले पुलाजवळ भरधाव कंटेनरने अनेक वाहनांना उडवलं, ४ जणांचा मृत्यू

Black Dark Lips: ओठांवरचा काळपटपणा कसा दूर कराल? या जादुई टिप्स वाचा

काँग्रेस उमेदवाराची कमाल, डिपॉझिट म्हणून चिल्लर भरली; निवडणूक अधिकारीही चक्रावले|VIDEO

Yami Gautam: कॉन्ट्रास्ट फॅशनचा नवा ट्रेंड, कश्मिरी ब्यूटी यामी गौतमचा पिंक ड्रेस लूक व्हायरल, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT