Rahul Gandhi trade deal statement saam tv
देश विदेश

आताची सर्वात मोठी बातमी! राहुल गांधींना निवडणूक लढण्यास आजीवन बंदी?

rahul gandhi news : राहुल गांधी आणि काँग्रेसचं टेन्शन वाढवणारी बातमी हाती आली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडण्यात आला आहे.

Vishal Gangurde

ट्रेड डीलवरून राहुल गांधींचे सरकारवर आरोप केलेत

भाजपने संसदेत राहुल गांधींच्या विरोधात अपात्रता ठराव मांडलाय

भाजपच्या ठरावावरून संसदेत राजकीय वातावरण तापलं

भारतीय जनता पक्षाने गुरुवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधींनी ट्रेड डीलवरून सरकारवर केलेले आरोप भाजपच्या खासदारांनी फेटाळून लावले आहेत. त्यानंतर आज संसदेत राहुल गांधींच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. अपात्रता ठराव मंजूर झाल्यानंतर राहुल गांधींना आजीवन निवडणूक लढण्यास बंदी येऊ शकते, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला आहे. या ठरावात राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करून त्यांना आजीवन निवडणूक लढवण्यास बंदी घालण्यात यावी, अशी मागणी खासदार दुबे यांनी केली. दुबे यांच्या मागणीने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे.

निशिकांत दुबे यांनी नेमकं काय म्हटलं?

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटलं की, 'मी आज लोकसभेत राहुल गांधी यांच्या विरोधात अपात्रता ठराव मांडला. राहुल गांधी हे देशाची दिशाभूल करत आहे. मी ठराव मांडलाय, त्यावर चर्चा व्हावी. राहुल गांधी यांचं लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना आजीवन निवडणूक लढण्यास आजीवन बंदीची मागणी केली आहे'.

राहुल गांधी यांनी काय म्हटलं होतं?

खासदार राहुल गांधी म्हणाले होते की, 'देश विकून लाज वाटत नाही. अमेरिका भारताचे निर्णय कसे घेऊ शकते? आता युनायटेड स्टेट्‍स ठरवणार की आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. युनायडेट स्टेट्‍स येऊन सांगेल की, आपण कोणाकडून तेल खरेदी करावं. आमचे निर्णय अमेरिका घेईल. आमचे निर्णय पंतप्रधान मोदी घेणार नाहीत'.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याने संसदेत एकच गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या टीकेला भाजपनेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर आज भाजपने राहुल गांधी यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Vegetables To Eat: पावसाळ्यात 'या' 5 भाज्या ठेवतील पोट साफ; अॅसिडिटी आणि अपचनाचा त्रासही होणार नाही

Mumbai Metro : मुंबईमध्ये मोठी दुर्घटना, धावत्या स्कूल बसजवळच मेट्रोचा स्लॅब कोसळला, शाळकरी मुलं थोडक्यात बचावली

Maharashtra News Live Update: सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचं तीव्र आंदोलन

FDA : अन्नात भेसळ वाटतेय? आता घरबसल्या नोंदवा तक्रार; FDA ची QR Code सुविधा सुरू

Income Tax Update: ITR मध्ये परदेशातली मालमत्ता दाखवायची राहिली? घाबरू नका! CBDTची नवी FAST-DS योजना लागू

SCROLL FOR NEXT