BJP MLA Sushil Singh convoy accident in Chandauli  
देश विदेश

BJP MLA : मध्यरात्री थरार! भाजप आमदारांच्या ताफ्यातील २ गाड्यांना स्कॉर्पिओची जोरदार धडक; गाडी रस्त्यावर पलटली अन्...

BJP MLA convoy Accident : उत्तर प्रदेशातील चंदौलीमध्ये भाजप आमदार सुशील सिंह यांच्या ताफ्यातील दोन फॉर्च्युनर गाड्यांना भरधाव स्कॉर्पिओने धडक दिली. या अपघातात एक गाडी पलटी झाली असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. आमदारांनी सुनियोजित हल्ल्याचा आरोप केला आहे.

Namdeo Kumbhar

BJP MLA Sushil Singh convoy accident in Chandauli : उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यात सोमवारी रात्री उशिरा भाजप आमदार सुशील सिंह यांच्या ताफ्यातील दोन फॉर्च्यूनर गाड्यांना एका भरधाव स्कॉर्पियोने धडक दिली. या अपघातात एक फॉर्च्यूनर गाडी रस्त्यावर पलटली, तर दुसऱ्या गाडीचेही नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत आमदार सुशील सिंह यांच्या गाडीला कोणताही धक्का लागला नाही.

अपघातानंतर ताफ्यातील काही जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. तर स्कॉर्पियोमधील पंकज नावाचा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आमदार सुशील सिंह यांनी हा अपघात नसून सुनियोजित हल्ला असल्याचा आरोप केला आहे. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. पोलीस अपघाताचे कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करत आहेत.

सोमवारी रात्री उशिरा भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओने जगदीशसरायजवळ भाजप आमदार सुशील सिंह यांच्या ताफ्यातील दोन फॉर्च्युनर गाड्यांना धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. आमदारांच्या ताफ्यातील काहीजण किरकोळ जखमी झाले, तर स्कॉर्पिओ गाडीत असलेला पंकज गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी बाबा कीनाराम स्वायत्त राज्य वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आमदारांचा ताफा जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने जात होता. फुटियाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या एका स्कॉर्पिओने ताफ्यातील फॉर्च्युनरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की फॉर्च्युनर रस्त्यावर पलटी झाली. त्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण जगदीशसराईजवळ ताफ्यातील दुसऱ्या फॉर्च्युनरला धडक दिली. अपघाताच्या वेळी आमदार सुशील सिंह हे देखील ताफ्यात उपस्थित होते. मात्र त्यांच्या वाहनाला कोणतीही इजा झाली नाही. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Shift Health: सतत नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांना हार्ट अटॅकचा धोका? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Ramayana Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! १००० कोटींच्या क्लबपासून फक्त एक पाऊल दूर

Maharashtra News Live Update: पुणे शहरातील 18 हॉटेल्सचे अन्न परवाने आणि नोंदणी FDA कडून निलंबित

Accident: सकाळी-सकाळी भयंकर अपघात, ट्रक आणि स्कॉर्पिओच्या धडकेत ५ जणांचा जागीच मृत्यू; ४ जणांची प्रकृती चिंताजनक

Vangyache Bharit Recipe : चुलीवर भाजलेल्या वांग्याचा खास स्वाद! हिवाळ्यात बनवा कोकण स्पेशल झणझणीत वांग्याचे भरीत

SCROLL FOR NEXT