BJP MLA Chhotelal Verma dies during treatment in Noida hospital saam tv
देश विदेश

दोन दिवसांपूर्वी ताप, अचानक प्रकृती खालावली; भाजप आमदाराचे निधन

BJP MLA Chhotelal Verma Dies During Treatment In Noida Hospital: आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार छोटेलाल वर्मा यांचे नोएडा येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला.

Omkar Sonawane

आग्रा जिल्ह्यातील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार छोटेलाल वर्मा यांचे निधन झाले आहे. ते 2022 मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना नोएडा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

ताप आल्यानंतर प्रकृती बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी ताप आल्याने छोटेलाल वामा यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना आग्रा येथील राजपूर चुंगी परिसरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने कुटुंबीय त्यांना दिल्लीला घेऊन जात होते. प्रवासादरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यानंतर त्यांना नोएडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून शोक व्यक्त

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी छोटेलाल वर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली. आग्रा येथील फतेहाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार छोटेलाल वर्मा यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद असल्याचे मुख्यमंत्री योगी यांनी म्हटले. तसेच दिवंगत आत्म्यास सद्गती आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थना त्यांनी केली.

भाजपच्या अनेक नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

उत्तर प्रदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनीही छोटेलाल वर्मा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी वर्मा यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधून संवेदना व्यक्त केल्या आणि त्यांना धीर दिला. तसेच एडा चे मदार पंकज सिंह यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी छोटेलाल वर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beetroot Rice Recipe : रोजच्या भाताला द्या भन्नाट ट्विस्ट! झटपट बनवा चविष्ट बीटरूट राईस, चेहऱ्यावरही दिसेल गुलाबी चमक

Maharashtra News Live Update : एसबीआय बँकेत दिवसाढवळ्या शेतकऱ्याचे ३५ हजार रुपये लंपास

Pune Tourism : बॅग भरो निकल पडो! वन डे ट्रिपमध्ये फिरा पुण्यातील 'हे' ५ स्पॉट्स

Rain Update : गणरायाला निरोप देण्यासाठी पाऊस हजेरी लावणार, 'या' २१ जिल्ह्यांना अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

घर बांधायचंय, होम लोन फेडायचंय? नवे नियम जाणून घ्या, PF मधून किती रक्कम मिळणार?

SCROLL FOR NEXT