BJP MLA Anil Sharma Dies After Cancer Battle saam tv
देश विदेश

भाजप आमदार आणि माजी मंत्र्यांचे निधन, राज्याच्या राजकारणात शोककळा

BJP MLA Anil Sharma Dies After Prolonged Battle With Cancer: उत्तरप्रदेशचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री अनिल शर्मा यांचे दिल्लीतील रुग्णालयात कर्करोगाच्या उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला.

Omkar Sonawane

उत्तरप्रदेशचे भाजप आमदार आणि माजी राज्यमंत्री अनिल शर्मा यांचे निधन झाले आहे. ते गेल्या अनेक दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल शर्मा यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपूर्ण जिल्हयावर शोककळा पसरली आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही अनिल शर्मा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी एक्सवर ट्विट करत म्हटले की, राज्याचे माजी राज्यमंत्री आणि बुलंदशहरच्या शिकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल शर्मा यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना आहे की, दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान द्यावे आणि शोकाकुल कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती द्यावी.

बुलंदशहर जिल्ह्यातील शिकारपूर विधानसभा मतदारसंघातील सुरजावली गावचे मूळ रहिवासी असलेले ६३ वर्षीय अनिल शर्मा गेल्या काही काळापासून कर्करोगाने त्रस्त होते. दिल्लीतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अनिल शर्मा यांनी तरुण वयातच राजकारणात प्रवेश केला होता. सुरजावली गावचे ते अत्यंत कमी वयात बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द घडवली.

बसपामधून राजकीय कारकिर्दीला सुरुवात

२००२ मध्ये अनिल शर्मा पहिल्यांदा खुर्जा विधानसभा मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर २००७ मध्ये सलग दुसऱ्यांदा खुर्जा मतदारसंघातून बसपच्या तिकिटावर त्यांनी विजय मिळवला. २०१२ मध्ये शिकारपूर विधानसभा मतदारसंघातून बसपच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

२०१७ मध्ये भाजपच्या तिकिटावर शिकारपूर विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांच्याकडे वन आणि पर्यावरण राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. यानंतर २०२२ मध्ये भाजपच्या तिकिटावर शिकारपूर मतदारसंघातून ते चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Health : वयानुसार किती तास झोप गरजेची आहे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: वाशिमच्या दुबळवेल जगदंबा देवीच्या मंदिरात चोरी

Silver Anklets Cleaning Tips: चांदीची पैंजण काळी पडली आहे? 'या' ५ घरगुती उपायांनी परत मिळवा चमक

OBC क्रीमी लेयरबाबत केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचा धक्का, जुन्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार

Aalyache Pani: १५ दिवस आल्याचे १ ग्लास पाणी प्यायल्याने काय होते?

SCROLL FOR NEXT