bjp leader arrested in drug case x
देश विदेश

BJP : भाजप नेत्याचा मुलाच्या कारमध्ये आढळले ड्रग्स, तरुणीसह पळून जाताना पोलिसाच्या अंगावर चढवली कार

Crime : भारतीय जनता पार्टीतील नेत्याच्या मुलाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. नेत्याच्या मुलाच्या कारमध्ये ड्रग्स सापडल्याचा दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

  • एका भाजप नेत्याच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.

  • नेत्याच्या मुलाकडे ड्रग्स सापडल्याचा दावा केला जात आहे.

  • आरोपी हा ड्रग्सच्या व्यापारामध्ये सहभागी असल्याचे म्हटले जात आहे.

Crime News : शनिवारी (२६ जुलै) गुन्हे शाखेच्या पथकाने भाजप नेते आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी सदस्य कमाल खान यांचा मुलगा माज खानला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माज खान हा बेकायदेशीर ड्रग्सच्या, अंमली पदार्थांच्या व्यापारामध्ये सहभागी आहे. माज खानवर पोलीस कर्मचाऱ्यावर कार चढवून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे. ही घटना मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये घडली आहे.

माज खान हा पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये ड्रग्स एका ठिकाणी पोहोचवणार होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांची अनेक पथके तैनात करण्यात आली. संध्याकाळी रीगल परिसरामध्ये माज खान दिसला, पोलिसांनी त्याला घेरले. पकडले जाऊ या भीतीने त्याने कार धेणू मार्केटच्या दिशेने नेली. वाटेतील एका पोलीस कर्मचाऱ्याला कारने चिडण्याचा माजने प्रयत्न केला. पण सतर्कतेमुळे पोलिस कर्मचाऱ्याचा जीव वाचला.

पोलिसांनी माज खानला पकडले. पकडल्यानंतर त्याने गोंधळ घालायला सुरुवात केली. त्याने पोलिसांना व्हिडीओग्राफी करुन कारची झडती घेण्यास सांगितले. माजच्या कारची झडती घेताना पोलिसांना कारमध्ये एक तरुणी असल्याचे समजले. कारमध्ये पोलिसांना संशयास्पद पावडर मिळाली, ही पावडर पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहे. ही पावडर अंमली पदार्थ आहे की नाही हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत.

तुकोगंज पोलिसांनी माज खानच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि सरकारी कामात अडथळा आणणे अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. माज मागील बऱ्याच महिन्यांपासून ड्रग्सच्या व्यवहारामध्ये सहभागी आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक संशयास्पद कारवायांचा आरोप असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT