bjp Saam Tv
देश विदेश

'५ कोटी दिले नाही, तर...'; भाजप नेत्याला जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

bjp leader receives threat : पंजाबमध्ये भाजप नेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

भाजप नेते सोहाना यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाली आहे

रुपा यांना ५ कोटी रुपयांची खंडणी मागणी

बाहेर देशातून फोनद्वारे धमक्या दिल्याचा आरोप

समाजसेवक, भाजप नेते रुपा सोहाना यांनी मागील अनेक दिवसांपासून धमक्या मिळू लागल्या आहेत. रुपा सोहाना यांना परदेशातून फोनद्वारे जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यांना कॉल करून थेट ५ कोटींची खंडणी मागितली जात आहे. ५ कोटी रुपये नाही दिले तर गंभीर परिणामाला सामोरे जावे लागेल, अशी धमकी मिळाल्याचे रुपा सोहाना यांनी सांगितल.

पंजाबमधील भाजप नेते रुपा सोहाना यांनी बुधवारी मोहाली येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सोहाना यांनी सविस्तर माहिती दिली. रुपा सोहाना म्हणाले, 'भाजपमध्ये प्रवेश केल्याने धमक्या मिळणे सुरू झालं आहे. माझा फोन बंद केल्यानंतर आरोपींनी माझा नगरसेवक मित्र आणि त्याच्या पत्नीच्या नंबरवरून धमक्या मिळणे सुरू झालं आहे. त्यांनी राणा बलाचौरिया आणि चिन्नी कुब्बाहेडी सारखे हाल करण्याची धमकी दिली'.

रुपा सोहाना यांनी म्हटलं की, 'वरिष्ठ पोलिसांना ३१ मार्चपर्यंत सुरक्षेसाठी एकत्र पत्र लिहिलं होतं. त्यानंतर एक पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी पाठवण्यात आला. परंतु १० दिवसानंतर पोलिसांची सुरक्षा पुन्हा हटवण्यात आली. त्यामुळे आणखी चिंता वाढली आहे'.

रुपा यांनी पुढे म्हटलं की, 'मी सर्वसामान्य माणूस आहे. प्रॉपटी एजंन्ट म्हणून देखील काम करतो. कब्बडी खेळाला प्रोत्साहन मिळण्यासाठी काम करतो. मी अनेकदा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिसांना सुरक्षेसाठी मागणी केली. परंतु फारशी दखल घेण्यात आली नाही. या धमक्यामुळे कुटुंब घाबरलं आहे'.

रुपा सोहाना कोण आहेत?

रुपा सोहाना हे समाजसेवक आणि भाजपचे नेते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT