BJP Leader Ravneet Singh Bittu Death Threat: Saam Tv
देश विदेश

BJP Leader: भाजपच्या दिग्गज नेत्याला दहशतवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी, राजकीय वर्तुळात खळबळ

BJP Leader Ravneet Singh Bittu Death Threat: भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. पाकिस्तानातील दहशतवादी संघटनेने व्हॉट्सअपवर मेसेज करत ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे.

Priya More
  • भाजपच्या ज्येष्ठ नेत्याला दहशतवाद्यांकडून धमकी

  • रवनीत सिंह बिट्टू यांना जीवे मारण्याची धमकी

  • रवनीत बिट्टूंना व्हॉट्सअॅपवर धमकीचा मेसेज

  • पंजाब पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू

  • भाजप नेत्याला धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. रवनीत सिंग बिट्टू यांना पाकिस्तानी दहशतवादी संघटना लष्कर-ए-झांगवीचा नेता मलिक इसाक याच्या नावाने व्हॉट्सअपवर मेसेज करून धमकी देण्यात आली. भाजप नेत्याला धमकी मेसेज येताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या धमकीनंतर पंजाब पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

रवनीत सिंग बिट्टू यांना व्हॉट्सअपवर धमकीचा मेसेज करून धमकी देण्यात आली. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपली ओळख मलिक अॅलेक्स अशी दिली आहे. धमकी देणारा म्हणाला की, ' आपल्या मर्यादेत राहा. तुमच्यासाठी १ किलोचा बॉक्स तयार आहे. मर्यादेबाहेर गेलात तर आम्ही आमचे ते काम करू ज्यात अनेक लोकं मारली जातील.'

यापूर्वी रवनीत सिंग बिट्टू यांच्या ताफ्यावर हल्ला झाला होता. बिट्टू यांनी दावा केला आहे की, पंजाबमधील बटालाजवळ आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यावर कथितपणे हल्ला केला होता. भाजपने आयोजित केलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोर्चात सहभागी होण्यासाठी रवनीत सिंग बिट्टू पठाणकोटला जात असताना ही घटना घडली होती. १०० पेक्षा जास्त आपच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या ताफ्याला घेराव घालत दगडफेक आणि अंडी फेकून मारली होती. यामुळे ताफ्यातील दोन वाहनांच्या काचा फुटून नुकसान झाले.

भाजप नेत्याने आरोप केला की, बटालाजवळ ताफा हळू झाला असता त्यांच्यावर हल्ला झाला. त्यांनी असाही आरोप केला की, या संपूर्ण घटनेदरम्यान स्थानिक पोलिस फक्त प्रेक्षक बनून राहिले. जर त्यांना किंवा त्यांच्यासोबत असलेल्यांना काही इजा झाली असती तर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्याचे पोलिस महासंचालक याला जबाबदार असतील.

रवनीत सिंग बिट्टू यांनी या घटनेची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाला दिली. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर बिट्टू यांच्या सुरक्षा पथकाने ३ जणांना अटक केली आहे. मात्र, पोलिसांकडून याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बींत सिंग यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू हे भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांनी सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होण्यासाठी पठाणकोटला जात होते. त्यावेळी ही घटना घडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mohan Yadav : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांच्या घरावर चालवला हातोडा, कारण आलं समोर

Burns-First Aid : स्वयंपाक करताना भाजलात?६० सेकंदांत करा 'हे' काम, लगेच मिळेल आराम

Maharashtra News Live Update: पावसाने पाठ फिरवली, शेतकऱ्याने उभ्या कपाशीवर फिरवला नांगर; उत्पादनाची आशा मावळली

Bike engine overheating: बाईकचं इंजिन ओव्हरहीट होऊ नये यासाठी काय करावं?

Sara Gurpal: क्रिकेट विश्वात खळबळ! अभिनेत्रीला आले भारतीय खेळाडूंचे मेसेज? सेहवागने भर मंचावर केली पोलखोल

SCROLL FOR NEXT