BJP leader Puneet Tyagi, whose body was found in Haridwar after being reported missing for several days. saam tv
देश विदेश

मोठी बातमी! भाजपच्या दिग्गज नेत्याचा हरिद्वारमध्ये मृतदेह सापडला, राजकारणात खळबळ

BJP Leader Puneet Tyagi Death Mystery In Haridwar: भाजपचे नेते पुनीत त्यागी यांचा मृतदेह हरिद्वारमध्ये सापडल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृतदेह आढळून आल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलिस तपास सुरू आहे.

Omkar Sonawane

भाजपचे दिग्गज नेते पुनीत त्यागी यांचा मृतदेह हरिद्वारमध्ये सापडला आहे. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, पुनीत त्यागी 29 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजेच्या सुमारास आपल्या कारखान्यात जाण्यासाठी घरातून निघाले, पण ते घरी परतलेच नाही. रात्री उशिरापर्यंत वाट बघून त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यांचा काहीच थांगपत्ता न लागल्याने, त्यांच्या पत्नी ममता त्यागी यांनी 1 फेब्रुवारी रोजी सहारनपुरमधील पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तात्काळ त्यांना शोधण्यासाथी पथके तयार केली आणि मोबाईल कॉलच्या सहाय्याने तांत्रिक तपास सुरू होता. दरम्यान सोमवारी त्यांचा मृतदेह हरिद्वारमध्ये सापडल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली.

पुनीत त्यागी यांच्या निधनाची बातमी समजताच भाजप कार्यकर्ते आणि स्थानिक राहिवाश्यांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी केली होती. पोलिसांच्या मते प्राथमिक दृष्ट्‍या त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं सांगितलं जात असले तरी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावरच नेमकं कारण कळेल असे पोलिसांनी सांगितले.

सध्या या घटनेमुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात असून अचानक त्यांचं बेपत्ता होणे आणि दुसऱ्या शहरात मृतदेह सापडणे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

Mumbai Water Cut: मुंबईकरांवर पाणीसंकट! 'या' तारखेपासून १० टक्के कपात, BMC चा मोठा निर्णय

प्रियकरासाठी पतीला विजेचा शॉक, अनैतिक संबंधात अडसर, पत्नीनं रचला कट

SCROLL FOR NEXT