Lal Krishna Advani admitted to APOLO Saamtv
देश विदेश

Lal Krishna Advani: भाजप नेते लालकृष्ण अडवाणींची प्रकृती खालावली, अपोलो रुग्णालयात उपचार सुरू

Lal Krishna Advani Health Update: भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असून अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. थोड्याच वेळात त्यांचे हेल्थ अपडेट डॉक्टर देणार आहेत.

Priya More

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली. अडवाणी यांना नवी दिल्लीतील अपोलो रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अडवाणी यांची प्रकृती गेल्या दोन आठवड्यापासून खूपच नाजुक असल्याचे सांगितले जात आहे. सध्या लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९७ वर्षे आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रकृती खालावली असून त्यांना शनिवारी सकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपोलोच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. लवकरच मेडिकल बुलेटिन जारी केले जाईल. लालकृष्ण अडवाणी ९७ वर्षांचे असून ते गेल्या अनेक महिन्यांपासून आजारीच आहेत. गेल्या ४-५ महिन्यांत ही चौथी वेळ आहे की त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ऑगस्ट महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांना दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी २६ जून रोजी त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूरोलॉजी विभागाच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया झाली. काही वेळाने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता.

लालकृष्ण अडवाणी हे गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयी समस्यांचा सामना करत आहेत. त्यामुळेच आजकाल ते त्यांच्या घरीच राहतात आणि कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला येत नाहीत. अडवाणी यांना यावर्षी देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्नही प्रदान करण्यात आला होता. मात्र प्रकृतीच्या कारणास्तव ते राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना त्यांच्या निवासस्थानीच भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० मार्च रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे देखेली त्यांच्या निवासस्थानी उपस्थित होते. २०१५ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अडवाणी हे वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान होते. ते देशाचे गृहमंत्री देखील राहिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

SCROLL FOR NEXT