BIHAR ROAD RAGE INCIDENT: BJP LEADER MANOJ SINGH’S NEPHEW MURDER, ACCUSED INJURED IN ENCOUNTER Saam Tv
देश विदेश

भाजप नेत्याच्या पुतण्याची भररस्त्यात गोळी झाडून हत्या, मेहुणा गंभीर; आरोपीचा पोलिसांकडून एन्काउंटर

Bihar Crime News : बिहारमधील सिवान येथे भाजप नेते मनोज सिंह यांच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या. एक जण गंभीर जखमी. आरोपीला पोलिसांनी चकमकीनंतर अटक केली असून तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • भाजप नेत्याच्या पुतण्याची हत्या

  • सिवानमध्ये रोड रेजमुळे गोळीबार, युवक ठार

  • हर्ष कुमार सिंह यांचा मृत्यू, चंदन सिंग गंभीर जखमी

  • आरोपी छोटू यादव पोलिस चकमकीत जखमी अवस्थेत अटकेत

  • घटनेमागील कारणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू

बिहारमधून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार मनोज सिंह यांच्या कुटुंबियांवर काल रात्री गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात त्यांच्या पुतण्याचा मृत्यू झाला असून त्यांचे मेहुणे गंभीर जखमी झाले आहेत. २८ वर्षीय हर्ष कुमार सिंह असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून मेहुणा चंदन सिंग यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. धक्कादायक म्हणजे गाडीची धडक लागल्याच्या वादातून गोळीबार करण्यात आल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या प्रकरणातील एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्याला पकडताना त्याच्या पायाला गोळ्या लागल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सिवान टाऊन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीपूर-अंदर ढाला उड्डाणपुलाजवळ घडली. चंदन सिंग आणि त्यांचा मुलगा हर्ष हे रस्त्याच्या कडेला गाडी पार्क करण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी समोरून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. काही क्षणांतच हा वाद हिंसक बनला आणि समोरच्या गटातील व्यक्तींनी चंदन सिंग आणि हर्ष यांच्यावर गोळीबार केला.

गोळीबारात दोघेही गंभीर जखमी झाले आणि रस्त्यावरच कोसळले. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी हर्ष कुमार सिंह याला मृत घोषित केले, तर चंदन सिंग यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणात पोलिसांनी कारवाई करत आरोपीचा शोध घेतला. आरोपीची ओळख छोटू कुमार यादव अशी पटली असून तो हुसैंगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हाथोडा गावचा रहिवासी आहे. गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपीच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या. सध्या आरोपीला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी त्याला पाटणा येथे हलवण्यात आले आहे. पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणामुळे सिवानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली पोलिसांचं 'ऑपरेशन वांगचुक'? दीपकेंवर शाईफेक, CJPच्या आंदोलनात गोंधळ

प्रेयसीसमोरच'पेंद्या भाई’चा गेम; १६ वार करत संपवलं; पोलिसांनी ३६ तासात तिघांना ठोकल्या बेड्या

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

रामरक्षा आंदोलनातून उद्धव ठाकरेंचा हिंदुत्वाकडे पुनरागमन? भगवा लूक चर्चेत

बोगस वसतिगृहांनी लाटलं कोट्यवधींचं अनुदान, कागदावर विद्यार्थी, वस्तीगृहाला टाळं

SCROLL FOR NEXT