मध्यप्रदेशच्या बिना शहरातून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. भाजपचे नेते हनुमंत सिंह ठाकूर यांचा मृत्यू झाला आहे. ठाकूर हे रस्ते अपघातात जखमी झाले होते. त्यांना रुग्णवाहिकेद्वारे पहिले मालथोन आणि नंतर चांगले उपचार मिळावे यासाठी सागर या शहरात नेण्यात आले. मात्र कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे ते रुग्णवाहिकेतील स्ट्रेचरवरून पडले असा त्यांच्या कुटुंबियाचा आरोप आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हनुमान सिंह ठाकूर हे सेमरा गणपत गावचे रहिवासी होते. ते भाजपच्या खिमलासा ग्रामीण विभागाचे सरचिटणीस होते. रविवारी १ मार्च रोजी ठाकूर एका रस्ते अपघातात जखमी झाले होते. त्यांना एका अज्ञात दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यांना सुरुवातीला रुग्णवाहिकेने मालथोन येथे आणले, तेथून त्यांना चांगल्या उपचारांसाठी सागर येथे नेण्यात आले. जखमी हनुमान ठाकूर यांना घेऊन सागर येथील एका खाजगी रुग्णालयात रुग्णवाहिका आली तेव्हा त्याचा मागील दरवाजा उघडा होता, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. ते स्ट्रेचरच्या ऐवजी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रुग्णवाहिकेच्या जमिनीवर पडले होते. यामुळे कुटुंबीय संतप्त झाले आणि त्यांनी रुग्णवाहिका चालकाला चोपून काढला.
बुधवारी उपचारादरम्यान हनुमान सिंग ठाकूरचा मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील सदस्य आणि ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोलिस ठाण्याला घेराव घातला. निषेधानंतर पोलिसांनी रुग्णवाहिका चालक पुष्पेंद्र अहिरवार, ईएमटी हेमराज पटेल आणि त्याला धडक देणाऱ्या दुचाकीस्वार (बाईक क्रमांक यूपी९४ एई ०३०२) विरुद्ध गुन्हा दाखल केला. खिमलासा पोलिस ठाण्याचे प्रभारी राधेश्याम पटेल म्हणाले की, कुटुंबाच्या तक्रारीवरून रुग्णवाहिका चालक आणि ईएमटी विरुद्ध निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वारावरही एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.