गुजरातमध्ये राजकीय घडामोडींना वेग
भाजप आमदाराचा राजीनाम्याचा इशारा
आमदाराच्या राजीनाम्याच्या इशाऱ्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षात उभी फूट पडली आहे. तर ठाकरेंच्या शिवसेनेतही बंडखोरी होणार असल्याची चर्चा आहे. टीएमसी आणि ठाकरे गटानंतर भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजप आमदाराने राजीनाम्याचा इशारा दिला आहे.
गुजरातमध्ये भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय. गुजरातच्या नर्मदा मतदारसंघातील आमदार डॉ. दर्शना देशमुख यांनी पक्षावर संताप व्यक्त केला आहे. काही दिवसांपूर्वी पक्षातील एका कार्यक्रमात नाराज होऊन उपोषणाला बसल्या होत्या. त्यानंतर पक्षाकडून अपमान झाला तर पदासहित पक्षाचा राजीनामा देईल, असा इशारा दिला होता.
आम आदमी पक्षाने आमदार दर्शना यांच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. आमदार दर्शना यांनी माझा अपमान म्हणजे आदिवासी समाजाचा अपमान झाल्याचा दावा केला आहे. आप पक्षाचे नेते चैतर वसावा यांनी म्हटलं की, एक महिला , आमदाराचा अपमान नव्हे, तर भागातील आदिवासींचा अपमान आहे. आमदार दर्शना या आदिवासी समाजाच्या आहेत. त्यांचा अपमान समाज सहन करणार नाही. भाजप नेहमीच आदिवासी समाजाचा अपमान करत राहिली आहे'.
चैतर वसावा यांनी पुढे म्हटलं की, 'भाजप सरकार आणि संघटनेत आदिवासी नेते, खासदार आणि आमदारांचा सन्मान होत नाही. आज आमदार दर्शना यांचा अपमान झाला आहे. त्यांना पद आणि पक्षाचा राजीनाम्याचा इशारा दिलाय. त्यांना भाजपमध्ये सन्मान होत नाही त्यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही. आदिवासी समाज आणि आम आदमी पक्ष त्यांच्यासोबत आहे. त्यांचा आणि आदिवासी समाजाचा अपमान आम आदमी पक्ष कोणत्याही परिस्थिती सहन करणार नाही'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.