bihar political news  Saam tv
देश विदेश

निवडणुकीच्या तोंडावर भाजपची मोठी कारवाई; ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

bihar political news : बिहार विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी कारवाई केली आहे. भाजपने ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

BJP Suspends 4 Leaders: बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते पक्षाची विचारधारा आणि आदेश बाजूला सारून भूमिका घेऊ लागले आहेत. या प्रकाराचा सामना बिहारमध्ये भाजपलाही करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने बिहारमधील ४ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

भाजपच्या विरोधात बंडखोरी करणारे ४ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हकालपट्टी करण्यात आलेले नेते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विरोधात बिहार विधानसभा निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे पक्षाच्या हायकमांडने या चौघांविरोधात कारवाई केली.या नेत्यांची ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. याबाबतचं पत्र देखील पक्षाने जारी केलं आहे.

पक्षाच्या हायकमांडने केलेल्या कारवाईत वरुण सिंह, अनूप कुमार, पवन यादव आणि सूर्यभान सिंह यांच्या नावाचा समावेश आहे. वरुण सिंह हे बहादुरगंज विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. अनूप हे गोपालगंज विधानसभातून निवडणूक लढत आहेत. दुसरीकडे पवन यादव आणि सूर्यभान सिंह हे अनुक्रमे कलहगांव , बडहरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

भाजपच्या आधी जनता दल युनायटेडने २ दिवसआधी १६ नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. पक्षाचे प्रदेश महासचिव चंदन कुमार सिंह यांनी या निर्णयाविषयी पत्र जारी केलं.

राष्ट्रीय जनता दलाने कोणाची हकालपट्टी केली?

मुंगेरच्या जमालपूरमधील माजी मंत्री शैलेश कुमार, जमुईच्या चकाई येथील माजी आमदार संजय प्रसाद, सीवनच्या बडहरिया येथील माजी आमदार श्याम बहादूर सिंह, भोजपूरच्या बडहरा येथील माजी आमदार रणविजय सिंह, शेखपुराचे बरबीधाचे माजी आमदार सुदर्शन कुमार, बेगूसरायच्या साहेबपूर कलमाचे अमर कुमार सिंह, वैशालीचे महुआहून डॉ. आसमा परवीन, औरंगाबादच्या नवीनगर येथून लब कुमार, कटिहालच्या कदवा येथून आशा सुमन, चंपारण पूर्व येथून मोतिहारीमधील दिव्यांशू भारद्वाज,सीवानच्या जिरोदेई येथून विवेक शुक्ला, गोपालपूरचे आमदार नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, कदवा येथील माजी मंत्री हिमराज सिंह, गया जी येथील माजी आमदार संजीव श्याम सिंह, गयाघाट येथील माजी आमदार महेश्वर प्रसाद यादव आणि मुजफ्फरपूर येथून प्रभात किरण यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Shah: अमित शाहांच्या वक्तव्याने महायुतीत खळबळ; शिंदेसेना-राष्ट्रवादीत अस्वस्थता

Maharashtra Live News Update: चेंबूरमध्ये उड्डाणपुलाखाली खडी मिक्सर मशीन ट्रक अडकला

Shocking : छठ पूजेदरम्यान सेल्फी घेताना होडी उलटली; तिघे तरुण नदीत बुडाले

Phaltan Doctor Case:सातारा प्रकरणात मोठी अपडेट; पोलिसांच्या हाती लागले डॉक्टर आणि आरोपीमधील चॅटिंग अन् सीसीटीव्ही फुटेज

नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर... उद्धव ठाकरेंचा अमित शाहांना घणाघाती इशारा|VIDEO

SCROLL FOR NEXT