Narottam Mishra BJP ticket controversy Saam
देश विदेश

Highway Blocked: भाजपनं माजी गृहमंत्र्यांचं तिकिट कापलं, हजारो कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांवर तुफान दगडफेक; सगळा हायवे ब्लॉक

Narottam Mishra BJP ticket controversy : भाजपचे माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापल्याची चर्चा रंगताच दतियामध्ये हजारो कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. महामार्ग रोखल्याने वाहतूकोंडी झाली.

Namdeo Kumbhar

Narottam Mishra, BJP protest : मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात भाजप नेत्याच्या कार्यकर्त्यांनी तुफान राडा केल्याची खळबळजनक बातमी समोर आली आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांचे आगामी निवडणुकीत तिकीट कापल्याची चर्चा पसरली. त्यानंतर त्यांचे हजारो समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. संतप्त कार्यकर्त्यांनी महामार्ग (हायवे) पूर्णपणे रोखून धरल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने तुफान दगडफेक केल्याने अनेक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

तिकीट कापल्याच्या रागातून कार्यकर्त्यांचा उद्रेक

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत नरोत्तम मिश्रा यांचे नाव नसल्याचे वृत्त समोर आल्यानंतर दतियामध्ये कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला. पाहता पाहता हजारो कार्यकर्त्यांचा जमाव महामार्गावर गोळा झाला. कार्यकर्त्यांनी टायर जाळून आणि रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडून महामार्ग पूर्णपणे ब्लॉक केला. यामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या.

जिल्हाअध्यक्षांचा राजीनामा

नरोत्तम मिश्रा यांचं तिकीट कापल्याचे समजताच संतप्त झालेल्या दातियामधील त्यांच्या समर्थकांनी एकामागोमाग एक भाजप पक्षाचा राजीनामे दाखल केले. संतप्त झालेल्या समर्थकांमध्ये दातिया जिल्हाध्यक्ष रघुवीर कुशवाहा यांच्या नावाचाही समावेश आहे. नाराज झालेल्या समर्थकांनी राष्ट्रीय महामार्ग रोखला आणि पोलिसांवर दगडफेकही केली. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील वाहतूक कोंडीमुळे हजारो वाहने महामार्गावर अडकून पडली आहेत.

भाजपला २४ तासांचा इशारा

काँग्रेसच्या उमेदवाराला दोषी ठरवल्यानंतर दातियाची जागा रिक्त झाली होती. पोटनिवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजप पुन्हा एकदा दातियामधून नरोत्तम मिश्रा यांना उमेदवारी देईल, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. पण तसे झाले नाही. नरोत्तम मिश्रा यांचे तिकीट कापण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या समर्थकांनी आंदोलन सुरू केले आणि हजारो समर्थक राष्ट्रीय महामार्ग ४४ वर जमले. महामार्ग रोखून त्यांनी नरोत्तम मिश्रा यांना तिकीट देण्याची मागणी केली. पुढील २४ तासांत तिकीट द्यावे, असा अल्टिमेटम त्यांनी भाजपला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी भाजप नगरसेविकेचं आंदोलन

Pune : मोठी कारवाई! जमीन फेरफार घोटाळा प्रकरणी १५ महसूल अधिकारी निलंबित

Raigad Fort : स्वराज्याच्या इतिहासातील एक महत्त्वाचा किल्ला, रायगडला गेल्यावर 'हे' ठिकाण पाहायला विसरू नका

Hypertension Management Routine: सकाळच्या या 5 सवयी तुमचा बीपी ठेवतील नियंत्रणात, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा इशारा

Famous Actor : बॉलिवूड अभिनेत्याचा भीषण अपघात; १३ फुटांवरून खाली पडला, शस्त्रक्रियाही झाली

SCROLL FOR NEXT