National Political News: देशात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसहित पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या घोषणा जाहीर करण्यात येणार आहेत. या घोषणेच्या अडीच महिने आधीच भाजपने तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने त्यांच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक दिल्लीत आयोजित केली आहे. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जेपी नड्डा हे मार्गदर्शन करणार आहे. (Latest Marathi News)
भाजपची केंद्रीय निवडणूक समिती उमेदवारांचे नाव, निवडणुकींच्या रणनीतीबाबत निर्णय घेते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसहित 5 राज्याच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची महत्वाची बैठक सुरू आहे.
या बैठकीत भाजप ज्या मदतारसंघात ताकद कमी झाली, त्या मतदारसंघासाठी योजना आखणार आहे. तसेच आगामी निवडणूक कशी जिंकता येईल, यावर चर्चा करण्यात येणार आहे.
तत्पर्वी, भाजप या बैठकीत निवडणुका जिंकण्यासाठी नवी रणनीती आखण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतर भाजप बैठक आयोजित करायचा. कर्नाटकाची निवडणूक १० मे रोजी घोषित करण्यात आली होती. तेव्हा भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने बैठक ९ एप्रिल रोजी आयोजित केली होती. यंदा भाजपने बैठक घेण्यासाठी घाई केल्याचं दिसत आहे.
भाजप आमदार मध्यप्रदेशला जाणार
दरम्यान, 19 ऑगस्टला राज्यातील भाजप आमदार मध्यप्रदेशला जाणार आहेत. 4 राज्यातील भाजपच्या 350 आमदारांचं भोपाळमध्ये ट्रेनिंग होणार आहे. 18 तारखेला आमदार भोपाळमध्ये पोहोचणार आहेत. निवडणूक पूर्व सर्व्हे करण्यासाठी आमदारांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे.
भाजप पक्षाची नवी रणनीती अशी ठरली आहे की, ज्या राज्यात निवडणूक होणार, त्या राज्यात इतर राज्यातील आमदार जाऊन सर्वे करणार आहेत. सर्व्हे करून त्याचा अहवाल वरिष्ठांना देणार आहे. त्याचं ट्रेनिंग आमदारांना दिलं जाणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.