BJP Candidate List Lok Sabha Election 2024  Saam tv
देश विदेश

Maharashtra Election 2024 BJP Candidates: भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रात कुणाकुणाला मिळाली उमेदवारी?

BJP Candidates List Declared for Maharashtra Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील २० उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे.

Vishal Gangurde

BJP's 2nd Candidate List for Maharashtra Lok Sabha Election 2024:

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने जाहीर केलेल्या यादीत राज्यातील २० उमेदवारांच्या नावांचा सामावेश आहे. या यादीत भाजपच्या दिग्गज नेत्यांचा सामावेश आहे. या यादीत नितीन गडकरी, पंकजा मुंडे, पियुष गोयल आदी नेत्यांच्या नावांचा सामावेश आहे. तर काही नेत्यांना डच्चू मिळाला आहे. (Latest Marathi News)

भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत नागूपरमध्ये नितीन गडकरी, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना करनाल येथून उमेदवारी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त हर्ष मल्होत्रा यांना पूर्व दिल्ली तर योगेंद्र चंदोलिया यांना उत्तर पश्चिम दिल्लीतून तिकीट मिळालं आहे. भाजपने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत १० राज्यातील ७२ जागांवरील उमेदवारांची घोषणा केली आहे.

भाजपने ७२ जागांची उमेदवारी घोषणा

गुजरात - ७

दिल्ली - २

हरियाणा - ६

हिमाचल प्रदेश - २

कर्नाटक - २०

उत्तराखंड - २

महाराष्ट्र - २०

तेलंगाना - ६

त्रिपुरा - १

महाराष्ट्रातील उमेदवारांवर होती विशेष नजर

भाजपच्या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्राच्या उमेदवारांवर विशेष लक्ष होतं. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना पक्षात प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. पहिल्या यादीत गडकरींचं नाव नसल्याने ठाकरेंनी भाष्य केलं होतं. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी दुसऱ्या यादीत नितीन गडकरी यांचं नाव यादीत असेल, असं भाष्य केलं होतं. त्यानंतर आज नितीन गडकरी यांना नागपुरातून उमेदवारी मिळाली आहे.

विदर्भातील १० पैकी ४ उमेदवारांची नावे जाहीर

भाजपने विदर्भातील 10 पैकी 4 जागेवर उमेदवार जाहीर केले आहेत. नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, चंद्रपुरातून सुधीर मुनगंटीवार, वर्ध्यातून रामदास तडस याना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली आहे. तर अकोल्यातून संजय धोत्रे यांची प्रकृती बरी नसल्याने मुलगा अनुप धोत्रे ला उमेदवारी जाहीर झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांचे नाव जाहीर झालं आहे. तर सुजय विखे यांना नगरमधून उमेदवारी जाहीर झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

PM Modi: बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात दिला रिमोट कंट्रोल; उद्धव ठाकरेंवर पीएम मोदींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT