BJP cautious after defeat in Karnataka SAAM TV
देश विदेश

कर्नाटकातील पराभवानंतर BJP सावध! सर्व खासदारांना 30 मे ते 30 जूनदरम्यान मतदारसंघातच राहण्याच्या सूचना

Latest Political News : नागरिकांशी भेटावं, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मुक्काम करावा असे आदेश दिले आहेत.

डॉ. माधव सावरगावे

BJP cautious after defeat in Karnataka : कर्नाटकातील पराभवानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष सावध झाला असून आतापासूनच लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. भाजपाने देशभरातील आपल्या सर्व खासदारांना 30 मे ते 30 जून दरम्यान मतदार संघातच राहण्याच्या सूचना केल्या आहेत. या दरम्यान त्यांनी नागरिकांशी भेटावं, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्यावेत, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मुक्काम करावा असे आदेश दिले आहेत.

केंद्रीय अर्थराज्य मंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी याविषयी माहिती माहिती दिली आहे. पक्षाकडून 30 मे ते 30 जून दरम्यान देशभरात अभियान राबवलं जाणार आहे. यात नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना लोकांच्या भेटीगाठी घेऊन त्यांचे प्रश्न जाणून घेण्याच्या सूचना पक्षाकडून देण्यात आल्या आहेत. हे पक्षाकडून राबवलं जाणारं एक संपर्क अभियान आहे. या अभियानांतर्गत लोकांचे समस्या, प्रश्न, अडचणी आणि लाभार्थ्यांच्या तक्रारी जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती कराड यांनी दिली आहे.

भाजप युवकांना घालणार साद

आगामी लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणुकीआधी भाजप युवकांना साद घालणार आहे. तरुण मतदारांपर्यत पोहोचण्यासाठी भाजपकडून युवा संवाद मेळ्याव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. येत्या 18 मे रोजी भाजपकडून युवा संवाद मेळाव्याचे आयोजन केले जाणार असून या युवा संवादातून तरुणांना करिअरबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. (Latest Political News)

कर्नाटकात भाजपचा मोठा पराभव

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ करत 135 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपचे सर्व प्रमुख नेत्यांनी प्रचार करून देखील भाजपला या मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं. त्यामुळे भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे. या निकलानंतर भाजप सावध झाला असून देशभरात खासदारांना आपापल्या मतदारसंघात जाऊन जनतेच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्याच्या सूचना पक्षाने दिल्या आहेत. (Latest Marathi News)

Edited By - Chandrakant Jagtap

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : निकालापूर्वीच कणकवलीत लागले नितेश राणेंच्या विजयाचे बॅनर

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT