Biporjoy Cyclone Update Saam TV
देश विदेश

Biparjoy Cyclone Update: बिपरजॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली; या राज्यांवर धोक्याची घंटा, हाय अलर्ट जारी

Ruchika Jadhav

Maharashtra Rain Updates: बिपरजॉय चक्रीवादळामुळे हवामानात मोठा बदल झाला आहे. राज्यात पावसाचे आगमन झाले असून मुंबईसह उपनगरांमध्ये सोसाट्याचा वारा सुटला आहे. येत्या काही तासांमध्ये बिपरजॉय चक्रीवादळ आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे. आज काही तासांतच वादळ गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे गुजरात किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Latest Biporjoy News)

बिरपजॉय चक्रीवादळाचा (Biparjoy News) वेग १२५ किमी प्रतितासावरून १५० किमी प्रतितास झाला आहे. वेग वाढल्याने किनारपट्टीवरील धोका देखील वाढला आहे. येत्या काही तासांत बिपरजॉय चक्रीवादळ पाकिस्तान किनापट्टीसह सौराष्ट्र तसेच कच्छ, गुजरातमधील मांडवी आणि कराची येथील किनापट्टीवर धडकणार आहे. १५ जूनपर्यंत वादळ येथून पुढे सरकेल.

वादळामुळे या सर्व किनारपट्ट्यांवरील नागरिकांच्या सुरक्षेसाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्यात. वादळाचा ताशी वेग १५० किमी इतका असल्याने पूरसदृश्य परिस्थितीची शक्याता आहे. परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसणार आहे. गुजरात (Gujrat) किनापट्टीवर वादळ धडकल्यावर अरबी समुद्र खवळणार असून सुमारे २ ते ३ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

नागरिकांना या वादळाचा जास्त त्रास होऊनये, यात कोणतीही जीवितहानी होऊनये यासाठी प्रशासन योग्य ती खबरदारी घेण्यास सज्ज आहे. जास्त धोका असलेल्या ६ जिल्ह्यांमध्ये निवारा केंद्र उभारण्यात आले आहेत. एनडीआरएफसह एसडीआरएफ देखील तैनात करण्यात आले आहे. १५ जूनपर्यंत वादळ कच्छ किनापट्टीपासून पुढे सरकलेले असेल. १४ जून रोजी वादळ उत्तरेकडे सरकल्यावर जामनगर, कच्छ, मोरबी आणि गिरसह सोमनाथ या भागांना मोठा धोका आहे.

चक्रीवादळाच्या (Cyclone) प्रभामुळे राज्यातील कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर दुसरीकडे राज्यातील काही भागात तापमान वाढण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT