बिपीन रावत यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार; संरक्षण मंत्री आज संसदेत देणार माहिती Saam Tv
देश विदेश

बिपीन रावत यांच्यावर दिल्लीत अंत्यसंस्कार; संरक्षण मंत्री आज संसदेत देणार माहिती

हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा पायलट आणि सीडीएसचे वरिष्ठ कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : तामिळनाडूच्या (Tamil Nadu) निलगिरी जिल्ह्यातील कुन्नूर येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि अन्य 11 जण ठार झाले. यामध्ये हवाई दलाच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचा पायलट आणि सीडीएसचे (CDS) वरिष्ठ कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दुर्घटनेतील एकमेव बचावलेले ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांच्यावर तामिळनाडूतील वेलिंग्टन (Wellington) येथील आर्मी हॉस्पिटलमध्ये (hospital) उपचार सुरू आहेत. (Bipin Rawat will be cremation in Delhi)

हे देखील पहा-

जनरल रावत यांच्या निधनावर राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री तसेच देशातील सर्वोच्च राजकारणी आणि माजी लष्करी अधिकाऱ्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांच्या पत्नीसह हेलिकॉप्टर अपघातातील मृतांचे पार्थिव वेलिंग्टन, तामिळनाडू येथील लष्करी रुग्णालयात ठेवण्यात आले होते. मृतदेह आज कुन्नूर येथील मद्रास रेजिमेंटल सेंटर आणि त्यानंतर नवी दिल्लीत (New Delhi) नेण्यात येणार आहे.

शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार होणार

सीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीवर शुक्रवारी दिल्ली कॅन्टोन्मेंटमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आज संध्याकाळपर्यंत त्यांचे पार्थिव लष्करी विमानाने राजधानीत पोहोचण्याची शक्यता आहे. शुक्रवारी मृतदेह त्यांच्या घरी आणले जातील आणि लोकांना सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत श्रद्धांजली वाहण्याची परवानगी दिली जाईल, त्यानंतर कामराज मार्ग ते दिल्ली छावणीतील बेरार स्क्वेअर स्मशानभूमीपर्यंत त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे.

राजनाथ सिंग संसदेत देणार माहिती

तामिळनाडूमध्ये कोसळलेल्या हेलिकॉप्टरबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह गुरुवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री सकाळी 11.15 वाजता लोकसभेत आणि दुपारी राज्यसभेत हेलिकॉप्टर अपघातावर वक्तव्य करतील. लष्कराच्या प्रोटोकॉलचे पालन करत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Prime Minister Narendra Modi) याबाबत माहिती दिली.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soyabean Pulao: कुकरमध्ये सोयाबीन पुलाव कसा बनवायचा?

Imran Khan: इम्रान खान यांची खरंच हत्या झाली का? जेल प्रशासनाने केला मोठा खुलासा

Maharashtra Politics: राज्यातील राजकारणात भूकंप होणार; राष्ट्रवादी अन् शिवसेनेच्या युतीची नांदी

Ghevda Bhaji Recipe: गावरान पद्धतीची घेवड्याची सुकी भाजी कशी बनवायची?

Pune : पुण्यात भेट द्यायलाच हवी अशी 5 पर्यटन स्थळे, नक्की फिरायला जा

SCROLL FOR NEXT