Bipin Rawat: हेलिकॉप्टर अपघातावर माजी अधिकाऱ्यानं उपस्थित केले प्रश्न

या अपघाताबाबत सशस्त्र दलांसोबतच देशासमोरही काही प्रश्न आहेत.
Bipin Rawat: हेलिकॉप्टर अपघातावर माजी अधिकाऱ्यानं उपस्थित केले प्रश्न
Bipin Rawat: हेलिकॉप्टर अपघातावर माजी अधिकाऱ्यानं उपस्थित केले प्रश्नSaam TV

देशाचे मुख्य संरक्षण प्रमुख म्हणजेच CDS जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे Mi-17VH हेलिकॉप्टर आज तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ कोसळले. त्यात बिपीन रावत यांचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरने सुलूर एअरबेसवरून उड्डाण घेतले. धुक्यामुळे दृश्यमानता कमी असल्याने हा अपघात झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. अपघाताचे कारण शोधण्यासाठी लष्कराने 'कोर्ट ऑफ इन्क्वायरी'चे आदेश दिले आहेत. या अपघाताबाबत सशस्त्र दलांसोबतच देशासमोरही काही प्रश्न आहेत.

Bipin Rawat: हेलिकॉप्टर अपघातावर माजी अधिकाऱ्यानं उपस्थित केले प्रश्न
हेलिकॉप्टर दुर्घटनेत CDS बिपीन रावत यांचं निधन

पहिला प्रश्न

देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तीला (संरक्षण प्रमुख) जनरल बिपिन रावत यांना घेऊन जाणारे अत्याधुनिक हेलिकॉप्टर कोसळले कसे हा मोठा प्रश्न आहे, हेलिकॉप्टर टेक ऑफ करण्यापूर्वी त्याची कसून चौकशी केली गेली होती. एवढेच नाही तर Mi-17VH हे एक स्टँडबाय हेलिकॉप्टर देखील आहे.

दुसरा प्रश्न

वृत्तसंस्था IANS ने भारतीय हवाई दलाच्या (IAF) माजी अधिकाऱ्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, एवढ्या महत्त्वाच्या व्यक्तीला घेऊन जाणारे हेलिकॉप्टर निघण्यापूर्वी हवामानाची स्थिती तपासली गेली नाही का?. जर हवामान खराब होते तर अधिकाऱ्यांनी फोनकरुन हेलिकॉप्टर परत का नाही बोलावले?

तिसरा प्रश्न

माजी अधिकाऱ्याने सांगितले की या अपघाताचे कारण तांत्रिक बिघाड किंवा हवामान असू शकते. जर सर्व काही सामान्य असेल तर अशीही शक्यता आहे की हेलिकॉप्टर कुन्नूरजवळ असल्याने ते डोंगराच्या माथ्यावर असलेल्या ढगांमधून खाली उडत होते की खाली हे तपासलं गेलं पाहिजे.

असंही होऊ शकतं

अधिकाऱ्याने सांगितले की, हेलिकॉप्टरमध्ये ब्लॅक बॉक्स असतो, त्याचा अभ्यास केला असता अपघाताच्या कारणांवर अधिक प्रकाश पडू शकेल. कारणं काहीही असोत... एक प्रत्यक्षदर्शी म्हणाला – धुके खूप होते. हेलिकॉप्टर झाडावर आदळले आणि क्रॅश झाले असेही घडू शकते.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com