Bill Gates Warns Saam Tv
देश विदेश

कोरोनाचा आणखी एक भयंकर व्हेरियंट? बिल गेट्स यांचा जगाला इशारा

Bill Gates Warns : बिल गेट्स म्हणाले की, जगाने अद्यापही कोरोना महामारीच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड दिलेले नाही.

साम टिव्ही ब्युरो

वॉशिंग्टन: देशात आलेली कोरोनाची तिसरी लाट (Corona) ओसरली असली, तरी चौथ्या लाटेचा धोका (Corona 4rd Wave) अद्यापही कायम आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही (Coronavirus Warning) असं तज्ज्ञांकडून सातत्याने सांगण्यात आलं आहे. अशातच मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक आणि दिग्गज अब्जाधीश बिल गेट्स (Bill Gates) यांनी कोरोनासंदर्भात पुन्हा एकदा इशारा दिला आहे. संपूर्ण जगाने अजून कोरोना महामारीच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड दिलेलं नाही, असं बिल गेट्स यांनी म्हटलं आहे.

कोरोनासंदर्भात इशारा देताना बिल गेट्स म्हणाले की, जगाने अद्यापही कोरोना महामारीच्या सर्वात वाईट टप्प्याला तोंड दिलेले नाही. आतापर्यंत आपल्याला कोरोनाचा सरासरी पाच टक्क्यांपेक्षा जास्त धोका जाणवलेला नाही. बिल गेट्स यांनी चेतावणी दिली की याहूनही अधिक संसर्गजन्य आणि अधिक प्राणघातक कोरोना प्रकार येण्याचा धोका आहे. ते म्हणाले की, आपल्याला या महामारीचा सर्वात वाईट टप्पा अजून पाहायचा आहे.

पुढे बोलताना बिल गेट्स म्हणाले की, त्यांना जगाला (Bill Gates Warns) घाबरवायचे नाही. पण आतापर्यंत आपण कोरोनाच्या सर्वात वाईट टप्प्याचा सामना केलेला नाही. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून जगभरात सुमारे 62 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तथापि, अलिकडच्या दिवसांत एकूण प्रकरणे आणि मृत्यूच्या संख्येत घट झाली आहे. यापूर्वी, डब्ल्यूएचओ प्रमुखांनी इशारा दिला होता की लोकांना अद्याप व्हायरसबद्दल काळजी करण्याची गरज आहे. ते म्हणाले की, अनेक देशांमध्ये कोरोना चाचणीत घट झाली आहे, त्यामुळे कोरोना महामारीचा पुन्हा उद्रेक होण्याचा धोका आहे.

दरम्यान बिल गेट्स यांनी जगाला असा इशारा देण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी डिसेंबर 2021 मध्येही त्यांनी जगाला अशाच प्रकारचा इशारा दिला होता. त्यावेळी एका वृत्त वाहिनीला इशारा देताना बिल गेट्स म्हणाले होते की, 'आपण अजूनही महामारीच्या संकटात आहोत. या जीवघेण्या व्हायरसमुळे आणखी एक व्हायरस तयार होऊ शकतो, जो अधिक संसर्गजन्य आणि प्राणघातक असेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT