देश विदेश

Shocking: ५ वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरले, नंतर...

Bihar Crime News: ५ वर्षाचा मुलगा खेळायला गेला आणि परत आला नाही. नंतर त्याचा विद्रूप मृतदेह गोणीत सापडला. पोलीस क्रूर हत्येचा तपास करत असून आरोपी शोधण्यात गुंतले आहेत.

Dhanshri Shintre

बिहारमध्ये झालेल्या एका भयंकर घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. जहानाबाद जिल्ह्यातील तेहता पोलीस स्टेशनअंतर्गत सारेन गावात बुधवारी रात्री पाच वर्षीय मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. आर्यन कुमार या मुलाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा विद्रूप मृतदेह एका गोणीत सापडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन बुधवारी संध्याकाळी 5:30 मिनिटांपर्यंत घरीच होता. त्यानंतर त्याला घराबाहेर खेळायला पाठवण्यात आले. परंतु तो नंतर परतला नाही. अंधार पडूनही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ते आपल्या शेजारी राहणाऱ्या ईश्वरी यादवच्या घराच्या मागे गेले असता त्यांना एक गोणी दिसली. त्यांनी ते उघडले असता आत आर्यनचा विद्रूप मृतदेह आढळला. मृतदेहावर धारदार हत्याराने केलेले वार स्पष्ट दिसत होते. ज्यामुळे ही हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आल्याचे उघड झाले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस अधिकारी, सीडीपीओ आणि गावातील इतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की काही दिवसांपूर्वी आर्यनच्या कुटुंबाचा त्यांच्या शेजारी असलेल्या ईश्वरी यादव यांच्या कुटुंबाशी काही वाद झाला होता. या कारणावरून ही हत्या झाल्याची शक्यता पोलिस तपासत आहेत. या घटनेनंतर ईश्वरी यादवचे संपूर्ण कुटुंब घरातून फरार झाले असून, पोलिसांनी त्यांच्या शोधासाठी विशेष पथक तयार केले आहे.

पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पंकज कुमार यांनी सांगितले की प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू आहे. मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा करून तो पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या अमानुष घटनेमुळे सारेन गाव तसेच आसपासच्या भागात तीव्र तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, तर गावकऱ्यांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT