Bihar Shocking : Saam tv
देश विदेश

Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह; कुटुंबीयांना हत्येचा संशय

Bihar Shocking : काँग्रेस नेत्याचा रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याची घटना घडली. नेत्याच्या मृत्यूवरून आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत .

Vishal Gangurde

काँग्रेस नेते वीर कमलेश सिंह यांचा मृतदेह गावात आढळला

ते सकाळी निवडणूक प्रचारासाठी घराबाहेर पडले होते.

रविवारी त्यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात सापडला.

कुटुंबीयांनी त्यांच्या हत्येचा संशय व्यक्त केलाय

बिहारच्या रोहतास जिल्ह्यात निवडणुकीच्या प्रचारासाठी घराबाहेर पडलेल्या काँग्रेस नेते वीर कमलेश सिंह यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला आहे. नोहट्टाच्या करमडीहा गावाजवळ रविवारी सकाळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

काँग्रेस नेत्याचे डोके रस्त्याच्या कडेला पाण्यात बुडालेले होते. तर चेहऱ्यावरील भुवयांजवळ रक्त होते. त्यांचा एक दात तुटलेला होता. कुटुंबीयांनी त्यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी टीपा येथील रहिवासी ६३ वर्षीय काँग्रेस कमलेश सिंह पक्षाचे पत्रके घेऊन बैजलपूर ला गेले होते.

कमलेश सिंह हे शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घटनास्थळापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका नाल्यावर बसले होते. परंतु शनिवारी ते त्यांच्या घरी परतलेच नाहीत. सकाळी करमडीह गावाच्या एका कडेला मृतदेह आढळला. कुटुंबातील सदस्य आणि गावकऱ्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, कमलेश सिंह यांचे कोणाशीही वैर नव्हते. ते रात्री नशेत असायचे'.

'कमलेश सिंह नशेत गुंग झाल्यानंतर कधी कधी घरी जात नव्हते. निवडणुकीसाठी घरातून प्रचाराला बाहेर पडायचे. त्यानंतर प्रचाराच्या ठिकाणी थांबायचे. यामुळे कुटुंबीय त्यांना शोधत नसायचे. मात्र, गावातील एका कडेला त्यांचा मृतदेह आढळल्यानंतर कुटुंबायांमध्ये एकच खळबळ उडाली. कमलेश सिंह यांच्या शवविच्छेदन अहवाल समोर आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचं कारण समोर येणार आहे. मात्र, कमलेश सिंह यांच्या मृत्यूवरून कुटुंबीयांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईकरांचा खोळंबा! भुयारी मेट्रो कोलमडली; सीएसएमटी स्थानकावर प्रवाशांचे हाल|VIDEO

भाडं मागायला गेली, भाडेकरूंनी घरमालकिणीसोबत असं काही केलं की सगळेच हादरले, बेडरूममध्ये...

Maharashtra Live News Update: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नांदेडच्या मुखेडमध्ये थोड्याच वेळात जाहीर सभा

Pink Saree Contrast Blouse: गुलाबी रंगाच्या साडीवर कोणता कॉन्ट्रास्ट ब्लाऊज उठून दिसेल?

Health Tips : मोड आलेले कडधान्य कच्चे खावे की उकडून? जास्त पौष्टिक काय? वाचा तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT