Bihar Crime News Saam Tv
देश विदेश

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

Bihar Crime News : बिहारमध्ये मामाच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने आत्ये भावाने तिची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिस तपास सुरू आहे.

Alisha Khedekar

  • बिहारच्या शेखपुरा जिल्ह्यात मामाच्या मुलीने लग्नाला नकार दिल्याने तरुणीची हत्या

  • आरोपी आत्ये भावाने दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने हल्ला केला

  • पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तपास सुरू आहे

  • पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे

प्रियकराला लग्नाला नकार दिला म्हणून प्रेयसीची हत्या अशा धक्कदायक घटना वारंवार आपण ऐकत आलो आहोत. मात्र मामाच्या मुलीने आत्येच्या मुलाशी लग्न करण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमधील शेखपुरा जिल्ह्यातील शेखपुरासराय बाजारपेठेतील एका गावात बुधवारी दिवसाढवळ्या एका तरुणीची निर्घृण हत्या करण्यात आली. माहिती मिळताच शेखपुरासराय पोलीस ठाण्यातील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलीस पोहचण्याआधी बाजारपेठेतील नागरिकांनी आरोपीला चांगलाच चोप दिला होता. पोलिसांनी मध्यस्थी करत आरोपीला नागरिकांच्या तावडीतून सोडवले. आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेले.

पोलीस तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत तरुणी तिच्या आत्येभावासोबत बाहेर गेली असल्याचं पीडितेच्या बहिणीने संगीतल. आरोपी बऱ्याचदिवसापासून पीडितेकडे लग्नाची मागणी करत होता. मात्र पीडितेने त्याला वारंवार नकार दिला. हा नकार चवताळलेल्या प्रियकराला पचवता न आल्याने त्याने पीडितेला जबरदस्तीने लग्न करण्यास भाग पाडले. पीडितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा आरोपीने तिचा पाठलाग केला, तिला पकडले आणि धारदार शस्त्राने तिच्या छातीवर हल्ला केला.

या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली. जखमी झालेल्या पीडितेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी भावाच्या मुसक्या आवळल्या असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी अशी पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे. दरम्यान या पिडीतेला न्याय मिळणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शेतकरी उपाशी आहेत, विकास करणाऱ्यांचा विमानाने प्रवास - उद्धव ठाकरे

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी 'भेंडी जेल' ठरेल फायदेशीर; अशा पद्धतीने करा वापर

Shocking : ४ वर्षांच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार; ६० वर्षांच्या नराधमाचा पोलिसांकडून एन्काउंटर

Actor Harassment: प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा; मानधन मागितल्यावर केली मारहाण, दिली जीवे मारण्याची धमकी

Gold Price Today: सोनं 6,662 रुपयांनी आणि चांदी 22,314 रुपयांनी स्वस्त; ही घसरण किती दिवस राहणार?

SCROLL FOR NEXT